बीड धारूर

धारूर घाटात ऑइल सांडल्याने वाहतूक कोंडी; एपीआय सुरेखा धस यांनी तात्काळ रस्ता पाण्याने धुवून घेत वाहतूक पुन्हा केली सुरळीत

बीड- धारूरच्या घाटात एक ते दीड किलोमीटर अंतरावर ऑईल सांडल्याने वाहतूक कोंडी झाली होती. याची माहिती धारूर पोलिस ठाण्याच्या एपीआय सुरेखा धस यांना मिळाल्यानंतर त्यांनी तो रस्ता तात्काळ पाण्याने धुवून घेत वाहतूक पुन्हा सुरळीत केली.
धारूरच्या घाटात नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाहतूक कोंडी होत असते. आज सकाळी एका ऑइलच्या टँकरमधून ऑईल लिकेज झाल्याने ते दीड किलोमीटरपर्यंत सांडले. त्यामुळे रस्त्यावरून जाणारे वाहन घसरू लागल्याने वाहतूक कोंडी झाली होती. धारूर पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने तात्काळ रस्ता धुवून वाहतूक मोकळी करून दिली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!