महाराष्ट्र राजकारण

नियम सर्वांना सारखेच, पोहरादेवी गडावरील गर्दीवरती तात्काळ कारवाई करा -मुख्यमंत्री

मुंबई -वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांच्या समर्थकांनी वाशिममधील पोहरादेवी गडावर गर्दी केली होती. या गर्दीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. कोविडच्या काळात अशा रितीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर, संबंधितांवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.
राज्यात कोविड परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वर्षा येथे एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील महानगरपालिका आयुक्तांशीदेखील संसर्ग रोखण्यासंदर्भात करीत असलेल्या उपाय योजनांबाबत मार्गदर्शन केले. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आज सकाळपासून झालेल्या गर्दीबाबत अनेक बातम्या माध्यमात आल्या आहेत. या सर्व बातम्यांची उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी. तसेच वाशिम जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिक्षक यांना याचा अहवाल द्यावा, अशा सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!