महाराष्ट्र राजकारण

वनमंत्री संजय राठोड पोहचले पोहरादेवीत; नागरिकांची प्रचंड गर्दी, पोलीसांकडून लाठीमार

तब्बल 40 किलोमीटरचं अंतर कापून अखेर वन मंत्री संजय राठोड यांचा ताफा अखेर पोहरादेवीत दाखल झाला. त्यानंतर राठोड यांनी कुटुंबासह जगदंबा मातेच्या मंदिरातील गाभार्‍यात जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर ते सेवालाल महाराज यांचं दर्शन घेणार आहेत. राठोड यांच्या स्वागतासाठी पोहरादेवीमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला.
संजय राठोड हे साधारण 10.55 च्या सुमारास यवतमाळमधून पोहरादेवीकडे सहकुटुंब रवाना झाले होते. हे 40 मिनिटांचं अंतर कापून ते तासाभरात पोहरादेवीत पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत शिवसेना नेते, पदाधिकारी आहेत. तब्बल 17 वाहनांच्या ताफ्यासह ते पोहरादेवीत आले आहेत. यावेळी मंदिर परिसरात हजारो लोक जमले आहेत. त्यामुळे राठोड यांची गाडीला वाट मिळण्यासाठी मोठी अडचण होत असल्याने पोलिसांना जमावावर लाठीमार करावी लागली. मंदिर परिसरात हजारो लोक जमल्याने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे तीन तेरा वाजले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!