बीड

‘तुमच्या शुभेच्छा सदैव माझ्या पाठीशी ! त्यामुळे गर्दी करून माझा वाढदिवस साजरा करू नका, खा. प्रीतमताईंचे भाजप पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांना आवाहन


बीड, दि. 16 (लोकाशा न्यूज) : आज दि. 17 फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दबंग खा. डॉ. प्रीतमताई मुंडे यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांबरोबरच पदाधिकार्‍यांना सोशल मिडीयातून आवाहन केले आहे. ‘तुमच्या शुभेच्छा सदैव माझ्या पाठीशी आहेत. यामुळेच मला सर्व सामान्यांच्या प्रश्‍नावर काम करण्यासाठी सातत्याने उर्जा मिळते, सध्या मात्र कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे गर्दी करून माझा वाढदिवस साजरा करू नका, असें आवाहन खा. मुंडेंनी केले आहे.
आपल्या सर्वांना ठाऊकच आहे, महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. महामारीमुळे उद्भवलेली परिस्थिती आता कुठे तरी पूर्ववत होत असताना राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होऊन परिस्थिती गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर माझा वाढदिवस साजरा करू नका, अशी विनंती मी आपणा सर्वांना केली होती. त्या अनुषंगानेच आपल्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी मी मुंबई किंवा बीड कार्यालयात उपलब्ध नसेल, आपल्या सर्वांच्या शुभेच्छा नेहमीच आमच्या पाठीशी असतात आणि त्यामुळेच सर्वसामान्यांसाठी काम करण्याची ऊर्जा मिळते. आपल्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी मी फोन तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून उपलब्ध आहे, आपल्या शुभेच्छांचा नेहमी सन्मान केला आहे, यापुढेही करत राहू, आपण सर्व माझ्या निर्णयाचे स्वागत कराल ही अपेक्षा बाळगते, असे खा. प्रीतमताईंनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!