बीड

शिवसेनेत गेलेल्या ‘त्या’ पाच नगरसेवकांवर कारवाईची टांगती तलवार ! उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागरांनी दाखल केलेल्या याचिकेवर जिल्हाधिकार्‍यांनी काढली नोटीस, 23 फेब्रुवारी रोजी होणार सुनावणी


बीड, दि. 16 (लोकाशा न्यूज) : बीड नगर पालिकेतील काकू नाना आघाडीच्या पाच नगरसेवकांनी पक्षांतर करीत शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई करावी यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर जिल्हाधिकारी यांनी नोटीस काढली असून 23 फेब्रुवारी रोजी यावर सुनावणी होणार आहे. या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बीड मतदारसंघात आ. संदिप क्षीरसागर आणि काका भारतभूषण क्षीरसागर यांच्यामध्ये सध्या शीतयुद्ध पेटले आहे. आ. संदिप क्षीरसागरांच्या जवळच्या कार्यकर्त्यांसह त्या नगरसेवकांना नगराध्याक्ष डॉ. भारतभुषण क्षीरसागरांनी यांनी मागच्या काही दिवसांपूर्वी आपल्या गटात घेतले, काकू नाना आघाडीकडून निवडून आलेल्या प्रभाकर पोपळे, रंजित बन्सोडे,सीता मोरे,कांताबाई तांदळे आणि अश्विनी गुंजाळ या पाच नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर काकू नाना आघाडीचे सचिव तथा नगर पालिकेचे उपाध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्याकडे सदर पाच जणांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत याचिका दाखल केलेली आहे. यावर सुनावणी करताना जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी या पाच नगरसेवकांना नोटीस पाठवली आहे, त्यावर येत्या 23 फेब्रुवारी रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. पक्षांतर बंदी कायद्यनुसार या नगरसेवकांवर कारवाई होणार का? अशी चर्चा आता होऊ लागली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!