केज

नांदुरघाटमधील भूमिहीन शेतकऱ्याला महावितरणचा शॉक,जमीन नाही वीज नाही तरीदेखील शेतीपंपाचे बिल सव्वा लाख रुपये


नांदुर घाट : दि. 04 (अमोल जाधव)
महावितरण कंपनीचा सावळा गोंधळ समोर येऊ लागला आहे ज्या शेतकऱ्याने वीज वितरण कंपनी विज कोटेशन भरून विज देईन याला परेशान होऊन जमीन विक्री व भूमिहीन झाला तरीसुद्धा विज न जोडता महावितरण कंपनीने लाईट बिल शेतीपंपाचे शेतकऱ्याच्यामाती मारल्याचे समोर आले आहे.
नांदुर घाट मधील सर्वे नंबर 44 याठिकाणी 2010 ला दत्ता वैजनाथ जाधव या युवक शेतकऱ्याने एक एकर शेती विकत घेतली शेतीला पाणी आवश्यक एक एकर बागायती करण्यासाठी 2014 15 ला कोटेशन 7000 रुपये भरले त्या शेतात वीज जोडण्यासाठी सात पोल व वीज तार आवश्यक होती शासनाच्या नियमाप्रमाणे कोटेशन पूर्ण भरले वारंवार पाठपुरावा करून देखील वीज कंपनीने वीज जोडणी केलीच नाही किंवा साधे पोल सुद्धा मोकळे उभा केले नाही शेवटी हताश होऊन वैतागून युवा शेतकरी दत्ता यांनी 2016 ला जमीन एक एकर होती तेवढी विकली व दत्ता भूमिहीन झाले व हॉटेलचा छोटा व्यवसाय करून उपजीविका भागु लागले एवढे होऊन 2017 मध्ये 56850 ₹ वीज वितरण कंपनीने वीज बिल दत्ता यांना दिले बिल पाहून विजेचा करंट लागतो तसे दत्ता यांना झाले जमीन नाही वीज जोडली नाही तरीदेखील लाईट बिल कसे आले यावर वरिष्ठांना बोलून व पूर्ण कैफियत वर्तमानपत्रात दिनांक 14 /11/ 2017 मांडून प्रकार निदर्शनास आणून दिला यावर वरिष्ठांनी चुकून झाले त्यांचे दुरुस्त होऊन जाईन असे सांगितले कॉम्प्युटर प्रॉब्लेम सांगितला व ही समस्या दूर करून घेतो असे सुद्धा सांगितले एवढे होऊन डिसेंबर 2020 मध्ये आणखी वीज वितरण कंपनीचे लोक दत्ता जाधव यांच्याकडे आले व तुमच्या शेतातला सर्वे करायचा आहे बिल खूप थकले आहे गुन्हा दाखल होईल पैसे भरा असे सांगितले व तुम्हाला बिल 125410 ₹ आले आहे डिसेंबर एन्ड पर्यंत भरून घ्या हे सर्व पाहुन व बोलणे ऐकून दत्ता यांची मनस्थिती खराब झाली ज्या जमिनीसाठी कोटेशन भरले ते कोटेशन परत दिलेच नाही तेथे लाईट नाही व जोडली नाही चार वर्ष झाले वैतागून जमीन विकली तरीपण विज बिल आलेच कसे या प्रश्नाने दत्ता यांचे मानसिक संतुलन अस्थिर झाले या वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे युवा उद्योजक दत्ता यांची मानसिक स्थिती अस्थिर झाली याला जबाबदार असणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकारी व कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जाधव कुटुंबीयांनी केली आहे.


“मला विज कधी दिली नाही माझे भरलेले कोटेशन परत दिले नाही वैतागून जमीन चार वर्षांपूर्वी विकली आज लाईन मेन बिल घेऊन आल्यावर सर्व सांगितल्यावर तो म्हणाला विज बंद करण्याचा अर्ज दिला होता का परंतु मला वीज जोडली नाही किंवा साधे पोल सुद्धा उभा केले नाही वीजच नाही तर बंद करण्याचा अर्ज देण्याचा विषय कुठे येतो या लोकांच्या त्रासाला कंटाळून एकमेव एक एकर सुद्धा ती जमीन मी विकून टाकली आता तर सव्वालाख बिल माझ्या नावे आले आहे मला न्याय हवा.

दत्ता वैजनाथ जाधव नांदुर घाट

त्या शेतकऱ्याला नांदुर घाट येथील ऑफिसला अर्ज द्यायला सांगा व अर्जात उल्लेख करा वीज जोडली नाही परंतु बिल आले म्हणून अर्ज द्या आम्ही कार्यवाही करतो बिल बंद करून टाकू व आलेली रक्कम माफ करून टाकू व या सर्व प्रकरणाची मी स्वतः चौकशी करून त्या शेतकऱ्याला न्याय देईल.
आंबेकर साहेब ( मुख्य अभियंता केज )

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!