पाटोदा

डोंगरकिंन्हीत थरार, जागेच्या वादावरुन भावकितल्या भावकीत गोळीबार

अंमळनेर ( लोकाशा न्युज ) पाटोदा तालुक्यातील अंमळनेर पोलीस ठाणे हद्दीतील डोंगरकिंन्ही बसस्थानकावर जागेच्या वादावरुन चक्क हवेतच गोळीबार करण्यात आला असल्याची माहिती मिळताच अंमळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे तसेच डीवायएसपी विजय लगारे यांनी घटनास्थळाला तातडीने भेट दिल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे .

अंमळनेर पोलीस ठाणे हद्दीतील डोंगरकिंन्ही येथील बसस्थानकावर जागेच्या वादावरुन गोळीबार करण्यात आल्यामुळे डोंगरकिंन्ही बसस्थानकावर भितीचे सावट निर्माण झाले आहे वाहनातुन आलेल्या इसमांनी जागेची कुरापत काढुन गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे .

डोंगरकिंन्ही बसस्थानकावर हाणामारी सह गोळीबार झाल्याची माहिती अंमळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे यांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतल्यामुळे पुढील अनर्थ तूर्तास टळला आहे डोंगरकिंन्ही येथे गोळीबार झाल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांना अंमळनेर ठाणे प्रमुख श्यामकुमार डोंगरे यांनी देताच तेही डोंगरकिंन्ही घटनास्थळी दाखल झाले होते रात्री उशीरापर्यंत अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती .

डोंगरकिंन्हीत झालेल्या गोळीबारात मँगझीन देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!