बीड पाटोदा

धाकटी पंढरी श्रीक्षेत्र नारायणगड भाविकांच्या दर्शनासाठी खुले

कोळगाव:- राज्य सरकारने नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवसापासून राज्यातील मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आल्याने भाविकांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. बीड जिल्ह्यातील धाकटी पंढरी म्हणून ओळखले जाणारे श्री क्षेत्र नारायण गड हे सुद्धा दि.०७ ऑक्टोबर रोजी दर्शनासाठी खुले करण्यात आले. यावेळी गडाचे मठाधिपती ह भ प शिवाजी महाराज तसेच काही भक्तगण यांच्या उपस्थितीत महाद्वार खुले करण्यात आले.बीड जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र नारायण गड ता शिरूर कासार येथील मंदिर तब्बल २० महिन्यांनंतर घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर दि.०७ ऑक्टोबर रोजी दर्शनासाठी खुले करण्यात आले. सकाळी चार वाजल्यापासून अभिषेक, समाधी पूजन, नित्य पुजा अर्चा करण्यात आली. पाच वाजता आरती झाली. त्यानंतर यावेळी गडाचे मठाधिपती ह भ प शिवाजी महाराज, काही भक्तजन यांच्या उपस्थितीत महाद्वार उघडे करून दर्शन व्यवस्था सुरू केली. भाविकांनी सकाळपासूनच दर्शनाचा लाभ घेतला. मंदिर खुले झाल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसत आहे.  संस्थानाच्या वतीने स्वागत तोफा वाजवून करण्यात आले. आज पहिल्याच दिवशी अनेक भाविकांनी श्री क्षेत्र नारायण गडावर येऊन दर्शनाचा लाभ घेतला. दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद, समाधान दिसत होते. देवस्थान समिती प्रशासनाने दर्शनाची चांगली सोय केली आहे. यावेळी गडाचे सेवेकरी नवनाथ काशिद हभप लक्ष्मण महाराज तकिक, आदी उपस्थित होते.

गडावर दर्शन व्यवस्था सुरळीत- हभप शिवाजी महाराज
नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून मंदिर देवस्थान प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या अनुषंगाने श्री क्षेत्र नारायण गडाच्या वतीने दर्शन व्यवस्था सुरळीत करण्यात आली आहे. दिवसभर असंख्य भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. शासनाच्या आदेशाचे पालन करुन भक्तांसाठी सर्व सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर ठेवून दर्शन होत आहे.असे महंत ह भ प शिवाजी महाराज यांनी दैनिक लोकाशा प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!