बीड गेवराई

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार

गेवराई तालुक्यातील गढी-माजलगाव रोडवरील टाकळी तांडा येथील घटना

गेवराई:- अज्ञात वाहनाच्या धडकेत एक 30 वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची घटना आज पहाटे सहा वाजता गेवराई तालुक्यातील गढी-माजलगाव रोडवरील टाकळी तांडा येथे घडली आहे. घटनेची माहिती मिळताच तलवाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. अशोक सखाराम माने (वय 30 वर्ष) रा. सेलू ता. गेवराई जि.बीड असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
अशोक माने हा तरुण गढी-माजलगाव महामार्गावर टाकळी तांडा याठिकाणी पायी चालत असताना त्याला अज्ञात भरधाव वेगातील वाहनाने जोराची धडक दिली. यामध्ये तो जागीच ठार झाला. यानंतर वाहनचालक वाहनासह पसार झाला. हि घटना आज पहाटे सहा वाजता ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. त्यानुसार माहिती मिळताच तलवाडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांनी पोलिस उपनिरीक्षक सुभाष माने व पो.काँ.राऊत यांना तात्काळ घटनास्थळी पाठवले. दरम्यान पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात नेला आहे. याप्रकरणी अज्ञात वाहनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांनी सांगितले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!