बीड पाटोदा

सगळेवाडी,महेंद्रवाडी परिसरात बिबटयाचा वावर ? परिसरात खळबळ ! वनविभागाचे दुर्लक्ष ?

 पाटोदा तालुक्यातील सगळेवाडी, महेंद्रवाडी परिसरामध्ये शनिवार दिं ९ रोजी राञी बिबट्या दिसल्याने गावांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते त्यातच सकाळी गुराख्याला दिसला तर अंकुश सगळे यांचे बोकड खाल्ले तर राजू गुजर यांची शेळी खाल्ली असुन वारंवार गुराख्यांच्या नजरेस येत आहे.बिबट्या दिसला असल्यामुळे या परिसरामध्ये घबराटीचे वातावरण पसरले असल्याची माहीती पाटोदा पंचायत समितीचे मा.सभापती बंटीशेठ सगळे यांनी दिली. याबाबत अधिक माहिती अशी की सध्या बिबटयाच्या दहशतीमुळे  पाटोदा तालुक्यात नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून तालुक्यातील सगळेवाडी,महेंद्रवाडी या गावांमध्ये बिबट्याचा वावर आढळून येत असून शनिवार दिं.९ रोजी गावातील गुराख्यांनी पाहिले आसुन यानंतर मात्र गावांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असुन अंकुश सगळे यांचे बोकड खाल्ले तर राजू गुजर यांची शेळी खाल्ली तर शिवाजी गुजर याची शेळी व पोपट गुजर यांच्या शेळीवर हल्ला केला असुन वारंवार गूराख्यांच्या नजरेस येत आहे.सगळेवाडी,महेंद्रवाडी परिसरामध्ये यामुळे मात्र खळबळ उडाली आहे याकडे तात्काळ वनविभागाने चौकशी करून या भागांमध्ये मोबाईल द्वारे पेट्रोलिंग करावी अशी मागणी पाटोदा पंचायत समितीचे मा.सभापती बंटीशेठ सगळे यांनी केली.माञ याकडे वनविभाग दुर्लक्ष करत आहे.जनावरे खाल्ली,हल्ले करु लागला बिबटया आता माणसावर हल्ला होण्याची वाट वनविभाग पाहत आहे का ? असे सगळे म्हणाले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!