बीड

अन् ‘त्या’ जखमी ऊसतोड कामगारास पंकजाताई मुंडेंनी दिला मायेचा आधार !

आस्थेने विचारपूस करत मुलांच्या संगोपनाची घेतली जबाबदारी ! कामगाराच्या घरची चटणी - भाकरीही केली गोड

बीड.दि.२४—–अहोरात्र राबून उदरनिर्वाह करणाऱ्या ऊसतोड कामगारांवर कुणापुढे हात पसरवण्याची वेळ येऊ देणार नाही.ऊसतोड मजुरांनी स्वाभिमानाने जीवन जगावे,तुमची नैतिक जवाबदारी माझी आहे अशा शब्दात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी पाडळी ता.शिरूर येथील जखमी ऊसतोड मजूर आणि त्यांच्या कुटुंबियांना मायेचा आधार दिला. या प्रसंगाने त्या कामगारालाही गहिवरून आले.

शिरूर तालुक्यातील पाडळी येथील ऊसतोड मजूर गणेश मिसाळ हे काही दिवसांपूर्वी प. महाराष्ट्रातील एका कारखान्यात अंगावर गेट कोसळून गंभीर जखमी झाले होते. भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि ऊसतोड मजुरांच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी मिसाळ आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला व तब्येतीची आस्थेने विचारपूस केली.यावेळी पंकजाताई मुंडे यांनी त्यांना धीर दिला. ऊसतोड मजूर हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, तुम्ही खचून न जाऊ नका, मी कायम तुमच्या पाठीशी आहे असे म्हणत मिसाळ यांच्या वृद्ध पित्याच्या पाठीवर हात टाकून आधार दिला. ऊसतोड मजूर गणेशला उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडे दाखवून त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या पायावर उभे करू असं सांगत त्यांच्या दोन्ही मुलांची जवाबदारी स्वीकारली. यावेळी गणेशच्या वडिलांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या आठवणींना उजाळा देत आज पंकजाताईंच्या रुपात मुंडे साहेब आल्याची भावना व्यक्त करत त्यांना जेवणाचा आग्रह केला. पंकजाताई यांनी देखील जमिनीवर बसून चटणी – भाकरी खाल्ली. या प्रसंगाने उपस्थितही गहिवरून गेले.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!