बीड

जिल्हा हादरला, बिबट्याच्या हल्ल्यात पंचायत समिती सदस्यपती ठार


आष्टी दि.23 ( प्रतिनिधी ) येथील पंचायत समिती सदस्य पती नागनाथ गर्जे यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाटसरा ( ता.आष्टी ) येथे घडली. सदरील घटनेने जिल्हा हादरला असून प्रचंड भीती निर्माण झाली आहे. प्रशासनाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होऊ लागली आहे.

आष्टी तालुक्यातील सुरडी पंचायत समिती गणाचे सदस्य आशा गर्जे यांचे पती नागनाथ गर्जे हे बिबट्याच्या हल्ल्यात जागीच ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती कळताच पोलीस आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!