गेवराई

अठरा वर्षीय तरुणाचा गोदावरी नदी पात्रात बुडून मृत्यू; पाच तासानंतर सापडला मृतदेह

गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील घटना

गेवराई :
गोदापात्रात पोहण्यासाठी गेलेल्या एका अठरा वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दि.७ रोजी सकाळी आठच्या सुमारास तालुक्यातील राक्षसभुवन येथे घडली.
या बाबत अधिक माहिती अशी की, राक्षसभुवन येथील अविनाश जगदीश नाटकर ( वय १८ ) हा शनिवार दि.७ रोजी राक्षसभुवन येथील शनी महाराज मंदिराजवळ गोदावरी नदीच्या पात्रात आपल्या मित्रांन सोबत सकाळी आठच्या सुमारास अंघोळीसाठी गेला होता. परंतु भरपुर वेळ झाला असून तो बाहेर न आल्यामुळे त्याची गावात वार्ता पसरली त्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी येऊन त्याची सर्वत्र शोधाशोध केली व सदरील घटनेची माहिती प्रशासनाला कळवली घटनास्थळी तहसीलदार सचिन खाडे, तलाठी वाकुडे मंडळाधिकारी यांच्यासह चकलांबा ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक झिंजूर्डे व पोलीस महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन प्रशासनासह गावकऱ्यांनी त्याचा सर्वत्र शोधाशोध केला त्यानंतर तब्बल पाच तासाने त्याचा शोध लागला तो गाळात फसलेला आढळून आला यावेळी नातेवाईकांनी एकच टाळो फोडला तर अविनाश नाटकर याचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याने या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!