बीड

शेतीच्या नुकसानीच्या नैराश्यातून युवकाची आत्महत्या

माजलगाव, (लोकाशा न्यूज) : तालुक्यातील पात्रुड येथील अदिनाथ किशोर शिंदे -20 या युवकाने  बेरोजगारी व शेतातील झालेल्या नुकसानीमुळे निराश झाल्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघड झाली.    दोन महिण्यांपुर्वी खाजगी हाँस्पीटलमध्ये खाजगी नौकरी करत असलेल्या अदिनाथला ही नौकरी कोरोनामुळे गमवावी लागली.त्यानंतर त्यांने शेतीकडे लक्ष देण्यास सुरूवात केली. परंतु मागील काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे तो मागील 4-5 दिवसांपासून नैराश्यग्रस्त दिसत होता.शनिवारी दुपारी त्याने घर सोडले व शेतात जावुन विषारी औषध प्राशन केले.रात्री उशिरापर्यंत तो घरी न आल्याने इकडे तिकडे शोध घेतला असता रविवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास तो शेतात झोपलेल्या आवस्थेत आढळून आला. यानंतर ग्रामीण पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून प्रेत शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!