महाराष्ट्र राजकारण

पार्थ पवारांनी पुन्हा घेतली आजोबांविरोधात भूमिका; पार्थच्या ‘त्या’ ट्वीटवर अखेर अजितदादांनी सोडले मौन, म्हणाले…

पुणे, 02 ऑक्टोबर: राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात ट्वीट केल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. अखेर यावर मौन सोडत अजित पवार यांनी, ‘मला काय तेवढाच उद्योग नाही, असं सांगत आपल्या शैलीत उत्तर दिले.

पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर अजित पवार यांना पत्रकारांनी पार्थ पवार यांच्या ट्वीटबद्दल विचारले. त्यावेळी त्यांनी पार्थची भूमिका ही राष्ट्रवादीची नसल्याचे स्पष्ट केले.’

माझी बहीण सुप्रिया सुळे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसची ती भूमिका नाही.

आता अलीकडची मुलं काय ट्वीट करतात. मग प्रत्येकवेळी तुम्ही विचारता तुमच्या मुलाने हे ट्वीट केलं. तुमच्या मुलानं ते ट्वीट केलं. तेवढाच मला उद्योग नाही. मला राज्यात अनेक प्रकारची जबाबदारी असते. जो तो स्वतंत्र विचाराचा असतो आणि प्रत्येकाने काय ट्वीट करायचं हा ज्याला त्याला अधिकार असतो’ अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

‘मराठा समाजाला असेल किंवा धनगर समाजाला असेल. ज्याला त्याला आपला न्याय हक्क मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे’ असंही अजितदादांनी सांगितले.

काय म्हणाले पार्थ पवार?

‘विवेक सारखी तरुण मुलं आत्महत्या करत आहेत, आता तरी मराठा समाजातील नेत्यांनी जागं होऊन तत्काळ मराठा आरक्षणाबाबत लक्ष द्यायला हवं. मराठा समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी आता सुप्रीम कोर्टात जाण्याचा पर्याय किंवा अन्य विचार करावा लागेल. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायला हवा अन्यथा विवेक सारख्या अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागू शकतो आणि हेच टाळण्यासाठी राज्य सरकारनं या प्रकरणात तातडीनं लक्ष घालावं अशी मी विनंती करतो.

जय हिंद जय महाराष्ट्, असे टीव्ट करत पार्थ पवार यांनी सरकारच्या विरोधात नाराजी व्यक्त करत इशारा दिला. मराठा समाजातील युवकाने आरक्षणासाठी आत्महत्या केली, त्यानतंर या मुद्दावर पार्थ पवार यांनी टीव्ट करून मराठा समाजातील नेत्यावर नाराजी सूर लावत सूचक इशारा दिला.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!