महाराष्ट्र

राज्य सरकारकडून बँकेतील कथित गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश

मुंबई, दि. 1 (लोकाशा न्यूज) : राज्य सरकारने मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सहकार विभागाच्या आयुक्तांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून त्यासाठी सहकार विभागातील तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या आर्थिक वर्षात बँकेला झालेला 48 कोटींचा तोटा तसंच भांडवलात झालेली घट आणि मनमानीप्रमाणे झालेल्या कर्जवाटपाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. दुसरीकडे मुंबई बँकेने मात्र ही नियमित तपासणी असल्याचा दावा करत कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचं म्हटलं आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्धी सहकारी बँक ही भाजपच्या ताब्यात असून प्रवीण दरेकर बँकेचे अध्यक्ष आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!