देश विदेश

अमित शाहांची तब्येत बिघडली, पुन्हा एम्समध्ये दाखल

दिल्ली, दि. 13 सप्टेंबर:- अमित शाह यांना शनिवारी (12 सप्टेंबर) रात्री 11 वाजता एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. श्वास घेण्यात त्रास होत आल्यामुळे अमित शहा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.
अमित शाह यांना 18 ऑगस्टला दिल्लीमधल्या ‘एम्स’ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. अमित शाह यांनी स्वतः ट्वीट करून याबद्दलची माहिती दिली होती.
“कोरोनाची सुरुवातीची लक्षणं दिसल्यानंतर मी कोरोना चाचणी केली. माझ्या चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती स्थिर आहे परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या माणसांनी कोरोना चाचणी करून घ्यावी अशी आहे”, असं अमित शाह यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!