देश विदेश

गुड न्यूज; स्वदेशी ‘कोव्हॅक्सीन’ लस प्राण्यांवरील चाचणीत यशस्वी


नवी दिल्ली, दि. १२ (लोकाशा न्यूज)
– देशात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनावर जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू असून अनेक ठिकाणी चाचण्यांना यश आलं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशातही कोरोना लसीवर काम सुरू आहे. याच दरम्याने स्वदेसी लसीसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. देशात विकसित होत असलेल्या भारत बायोटेक कंपनीच्या Covaxin बाबत आनंदाची माहिती मिळत आहे. स्वदेशी लसीची प्राण्यांवरील चाचणी यशस्वी झाली आहे. भारत बायोटेक कंपनीने मोठी घोषणा केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, लाईव्ह व्हायरल चॅलेंज मॉडेलमध्ये प्राण्यांवर केलेल्या प्रयोगात ही लस सुरक्षित असल्याचं दिसून आलं आहे. बायोटेकने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचं ट्विट देखील केलं आहे. माकडांवर केलेल्या लशीच्या प्रयोगानंतर त्यांच्यातील रोगप्रतिकारक शक्ती विकसित झालेली दिसून आली आहे. भारत बायोटेक आणि आयसीएमआर मिळून कोवॅक्सीन विकसित करत आहे. 

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!