बीड

सासरच्या जाचास कंटाळून विवाहितेची विहिरीत उडी घेवून आत्महत्या

पाच जणांवर नेकनूर पोलीसात गुन्हा दाखलनेकनूर : गेल्या काही वर्षापुर्वी लग्न झालेल्या एका विवाहितेचा पती, सासु, सासर्‍यासह घरातील अन्य लोकांकडून किरकोळ कारणामुळे वारंवार छळ होत असल्याने या छळाला कंटाळुन एका 29 वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी देवून जीव दिल्याची घटना काल चार वाजता बीड तालुक्यातील पिंपळवाडी येथे घडली. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात विवाहितेच्या मृत्यूस कारणीभुत ठरल्या प्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल झाला असून त्या प्रकरणाचा पुढील तपास नेकनूर पोलीस करत आहेत.
तमन्ना हुजुर सय्यद (वय 29 वर्षे रा.पिंळवाडी ता.बीड) हीचा पिंपळवाडी येथील हुजुर खादर सय्यद यांच्या सोबत गेल्या काही वर्षापुर्वी विवाह झाला होता. विवाह झाल्यानंतर काही वर्षे सर्वकाही सुरळीत होते. त्यांना तीन आपत्य ही झाले. त्यानंतर मात्र किरकोळ कारणावरून पती हुजुर खादर सय्यद, सासरा अब्दुल खादर सय्यद, सासु सहिरा खादर सय्यद, दीर जावेद जाफर सय्यद यांनी वारंवार छळ सुरू केला. या छळाला कंटाळुन तमन्ना हुजुर सय्यद हीने काल 4 वाजता पिंपळवाडी शिवारातच एका विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. या घटनेची माहिती नेकनूर पोलीसांना मिळताच नेकनूर पोलीस ठाण्याचे एपीआय लक्ष्मण केंद्रे, पोलीस कर्मचारी संतोष राऊत, सुरेश पारधी, राम ढोबळे, गोविंद राख, यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर ही आत्महत्या नसून आमच्या पोरीला मारले आहे असे मयत तमन्ना हुजुर सय्यद हीच्या माहेरच्यांनी नेकनूर पोलीसात तक्रार दिल्याने वरील पाच आरेापी मयत तमन्ना सय्यद हीच्या कारणीभुत ठरल्या प्रकरणी नेकनूर पोलीसात 306 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पीएसआय विलास जाधव हे करत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!