बीड

आज 62 जण कोरोनामुक्त होणार


बीड, दि. 5 :(Beed corona update) आज जिल्हाभरातून 62 रूग्ण कोरोनामुक्त होणार आहेत. यामध्ये बीड 22, आष्टी 2,पाटोदा आणि शिरूर प्रत्येकी एक, गेवराई 3, माजलगाव आठ, वडवणी 3, धारूर 2, केज 8, अंबाजोगाई 8 आणि परळीतील चार जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 5109 रूग्ण बाधित सापडले आहेत. 138 जणांचा मृत्यू तर 3612 जण बरे होवून घरी परतले आहेत. सध्या 1359 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनातून बरे होणार्‍या रूग्णांची टक्केवारी 70.70 एवढी आहे. तर मृत्यूची टक्केवारी 2.70 इतकी आहे. (Beed corona news)

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!