बीड

बीडचे तात्कालिन अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांना आयएएस दर्जा

23 अधिकार्‍यांना मिळाली बढतीबीड : बीड जिल्ह्यात अतिरिक्त अप्पर जिल्हाधिकारी म्हणून उत्कृष्ट कामगिरी करणारे शिवानंद टाकसाळे यांना आता आयएएस दर्जा प्राप्त झाला आहे, शासनाने 23 अधिकार्‍यांची नियुक्ती केली असून त्यात टाकसाळे यांचाही समावेश आहे.
महाराष्ट्राच्या 23 राज्य लोक सेवेच्या अधिकार्‍यांना आज थेट केंद्राच्या आयएएस पदावर बढती देण्यात आली आहे. केंद्र सरकारचे सचिव पंकज गंगवार यांनी गुरूवारी या बढतीचा आदेश दिला. आयएएस (बढतीवर नियुक्ती) कायदा 1955 नुसार ही बढती करण्यात आली आहे. यानुसार राज्य लोकसेवेचे अधिकारी बढतीवर आएएस नियुक्त केले जातात. एखाद्या राज्यात आयएएस पदे रिक्त असतील तर त्याजागी या अधिकार्‍यांची नियुक्ती केली जाते. यानुसार महाराष्ट्राच्या 23 अधिकारी आयएएस झाले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!