बीड

जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, आ. धसांसह 75 जणांवर गुन्हा


बीड, दि.4 (लोकाशा न्युज) ः जिल्ह्यात जमावबंदी असतांना शिरुर शहरातील एका मंगल कार्यालयामध्ये उसतोड मजुरांच्या प्रश्नी गुरूवारी दि.4 सप्टेंबर रोजी आ. सुरेश धस यंानी मेळवा घेतला. या मेळाव्यास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे शिरुर पोलीस ठाण्यात पोना. मारोती केदार यांच्या फिर्यादीवरुन आ.सुरेश धस, जयदत्त धस, गणेश भांडेकर, अरुण भालेराव, प्रकाश बडे, शिवाजी पवार, बाबुराव केदार, दशरथ वनवे, प्रकाश देसरडा, रामदास हांगे, सुरेश उगलमुगले, कल्याण तांबे, अजय कुरचेरीया, रामदास बडे, अनवर शेख, ज्ञानेश्वर उटे यांच्यासह इतर 70 ते 75 अज्ञातांवर कलम 188, 269, 270 भादवी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अंमळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील बैठक घेतल्याने तिथे देखील आ. धसांसह इतर गुन्हे दाखल झाले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!