पाटोदा

कोतनजवळ झालेल्या अपघातात एक जागीच ठार


अंमळनेर : पाटोदा तालुक्यातील अंमळनेर जवळ असणार्‍या कोतन जवळ वाहनाच्या धडकेत एक जागीच ठार झाला हि घटना रविवारी रात्री साठे आठ ते नऊ च्या दरम्यान घडली, या धडकेत सदरील इसमाचा अक्षरक्ष चेंदामेंदा झाला होता अपघाताची माहिती होताच अंमळनेर पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष एपीआय श्यामकुमार डोंगरे लगेच सुत्रे हलवून धडक देऊन फरार झालेला टँकर हातोला चेकपोस्ट पकडुन टँकर चालकास गजाआड केले होते.
अंमळनेर पोलीस ठाणे अंतर्गत असणार्‍या कोतन गावाजवळील उतारावर (एम.एच. 23 ए. जी.3283) या स्पेलेंन्डर गाडीवरील इसमास भरधाव वेगाने येणार्‍या एचपी गँस टँकरने जोरदार धडक दिल्याने सदरील इसमाचा अक्षरशः डोक्याचा चेंदामेंदा होऊन इसम जागेवरच ठार झाला होता, ही घटना 30 ऑगस्ट रविवार रोजी रात्री साठे आठ ते नऊच्या दरम्यान घडली. कोतन जवळ इसमास धडक देऊन फरार झालेल्या टँकर चालकाच्या मुसक्या अंमळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे यांनी हातोला चेकपोस्ट वर आवळ्या रात्री उशीरापर्यंत सदरील इसम कुठला ? त्याचे नाव गाव काय ? कुठुन कुठे आला चालला होता ? याचा शोध घेण्याचे काम प्रगतिपथावर अंमळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे ,पोलीस कर्मचारी ,रवि आघाव ,अतुल भवर ,विलास गुंडाळे ,सचिन तांदळे ,बदाम आडसुळ ,होमगार्ड दिलीप घोशीर ,वाहन चालक वारे हे घेत होते . दरम्यान कोतन जवळ दुचाकीवर ठार झालेल्या इसमाचे नाव दुचाकी नंबर वरुन प्रणव गुरव येत आहे या अनुषंगाने तपास सुरु असुन लवकर सदरील इसमाचे नाव गाव कळुन येईल असे अंमळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे यांनी सांगितले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!