बीड

‘उद्धवा अजब तुझे सरकार, खुले करा हरिचे व्दार’

भाजपाच्या अनोख्या घंटानाद आंदोलन बीडमध्ये सुरूवातबीड : ‘उध्दवा अजब तुझे सरकार, खुले करा हरिचे व्दार’ असा घोष करत
राज्यातील संपूर्ण धार्मिक स्थळे आणि मंदीरे खुले करण्याच्या मागणीसाठी भाजपकडून संपूर्ण बीड जिल्ह्यात आज घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे. हे अनोखे आंदोलन संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष वेधून घेत आहे.

राज्यातील मंदिरे खुळी करण्याची परवानगी द्यावी या मागणीसाठी आज सकाळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली बीड भागातील प्रसिद्ध श्री बालाजी मंदिरासमोर भाविक भक्त व कार्यकर्त्यांच्या सहभागातून घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी बाळकिसन सिकची, दत्ताजी नलावडे, भगीरथ दादा बियाणी, विक्रांत हजारी, डॉ. लक्ष्मण जाधव, शांतिनाथ डोरले, अनिल चांदणे, संग्राम बांगर, विलास बामणे, दत्ता परळकर, अमोल वडतीले, कपिल सौदा, महेश सावंत, बद्रीनाथ जटाळ , रवींद्र कळसाने,अर्जुन राव बोंडगे, गणेश मोरे, विजय देशमुख, संभाजी पाटील सुर्वे, दिलीप डोंगर ,महेश सावंत कृष्ण बहीरवाळ, यांच्यासह भक्तगण कार्यकर्ते उपस्थित होते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!