बीड

नियम डावलणे नागरिकांसह दुकानदारांना भोवले

सीईओंच्या आदेशाने जिल्ह्यात एकाच दिवशी 20 गावात झेडपीची धडकली पथके, नियम तोडणार्‍यांवर दंडात्मक कारवाई, 1 लाख 38 हजारांचा दंड केला वसूलबीड : कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलेली आहेत, त्याअनुषंगानेच सर्व ग्रामपंचायतींबरोबरच त्या गावातील नागरिकांनी स्वत:कडून कोरोनाचा प्रसार होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केलेले आहे. असे असतानाही अनेकांना याचे काहीच देणे घेणे नाही, ते सहजपणे प्रशासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करत आहेत. या अनुषंगानेच सीईओंच्या आदेशानुसार काल जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांची पथके अचाणक जिल्ह्यातील 22 गावात धडकले, यावेळी अनेक जण नियमांचे उल्लंघन करताना आढळून आले, अशा लोकांवर आणि दुकानदारांवर जिल्हा परिषदेच्या या पथकांनी दंडात्मक कारवाई केली आहे, 22 गावातून जवळपास 1 लाख 37 हजार 700 रूपयांचा दंड वसूल करून तो ग्रामपंचायतींच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे.
जिल्हाधिकार्‍यांनी पाच जुलै 2020 रोजी व सीईओंच्या कार्यालयाचे सहा जुलै रोजीच्या आदेशाची ग्रामपंचायत स्तरावर केले जाणार्‍या अंमलबजावणीची तपासणी करण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावरून 11 तालुक्यासाठी वर्ग एकचे अधिकार्‍यांच्या पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. सदर नियुक्त पथकांनी 20 ऑगस्ट 2020 रोजी नेमून दिलेल्या तालुक्यातील प्रत्येकी 2 ग्रामपंचायतींना भेटी देवून कोवीड 19 विषयक प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन न करणारे नागरिक व दुकानदारांविरूध्द दंडात्मक कारवाई केली. 22 गावात दंडात्मक कारवाई केली आहे. यामध्ये परळीतील सिरसाळा (दंड 3200), वाका (दंड 4000), धारूरमधील चोरंबा (दंड 2500), गोपाळपुर (दंड 4000), वडवणीतील चिखलबीड (दंड 500), चिंचाळा (दंड 500), गेवराईतील चकलांबा (कंटेनमेंट झोन), मादळमोही (दंड 12500), शिरूरमधील जाटनांदूर (दंड 500), नांदेवली, केजमधील होळ (दंड 500), आडस (दंड 6500), पाटोद्यातील डोंगरकिन्ही (दंड 15500), अंमळनेर (दंड 5500), बीडमधील नेकनूर (दंड 15500), चौसाळा (दंड 2500), माजलगावमधील पात्रूड (दंड 23000), दिंद्रुड (दंड 9000), अंबाजोगाईतील घाटनांदूर (दंड 2000), बर्दापुर (दंड 1000) आणि आष्टीतील धामणगाव (दंड 29000), कडा (कंटेनमेंट झोन) या गावांचा समावेश आहे. वसूल करण्यात आलेला दंड ग्रामपंचायतींच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. कारवाईसाठी नेमलेल्या पथकांमध्ये प्रकल्प संचालक दादासाहेब वानखेडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं) डी.बी.गिरी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद जटाळे, बांधकाम एक आणि दोनचे कार्यकारी अभियंता पी.जी.हळीकर, लपाविचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे, ग्रापापुुचे कार्यकारी अभियंता एस.यु.खंदारे, शिक्षणाधिकारी (प्रा.) अजय बहिर, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी राजेश खटावकर, कृषी विकास अधिकारी राजेश साळवे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व्ही.बी.देशमुख, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (स्व.भा.मि.) प्रदिप काकडे यांचा समावेश होता. बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोविड 19 विषयक प्रादुर्भाव व प्रसार टाळण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व दंडात्मक कार्यवाही टाळावी, तसेच सर्व सरपंच व ग्रामसेवकांनी दिलेल्या नियमांचे काटेकारपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!