परळी

कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी परळीत नव्याने दोनशे खाटांची मंजुरी

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांची माहिती



परळी : परळी शहरातील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी याठिकाणी नव्याने दोनशे खाटा व कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्यास मंजुरी मिळाली असुन परळी येथे पूर्वीचे शंभर व नव्याने दोनशे अशा एकुण तीनशे जणांवर उपचार होणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी सांगितले.
डॉ.आर.बी.पवार यांनी गुरुवारी दि. 20 रोजी परळी शहरातील चार अन्टीजन तपासणी केंद्रांना भेटी दिल्या. परळी शहर व परिसरात कोरोना बाधीत रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सध्या शंभर खाटांची व्यवस्था आहे परंतु ही व्यवस्था अपुरी पडत असल्याने नविन दोनशे खाटा व त्यासाठी आवश्यक कर्मचारीबळास मंजुरी मिळाली असल्याचे डॉ. पवार यांनी यावेळी सांगुन आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन बीड जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. नागरीकांनी प्रशासनाकडुन आलेल्या सूचनांचे पालन करावे, कोरोनास घाबरुन न जाता स्वतःची काळजी घ्यावी असे सांगुन परळी शहरातील व्यापारी व नागरीकांची तीन दिवस अँटिजेंन टेस्ट करण्यात आली असुन यानंतरही डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीगृह येथील कोवीड केअर सेंटरला कोरोना तपासणी नियमीतपणे सुरु राहणार असल्याचे सांगीतले. डॉ. पवार यांनी परळी शहरातील चार कोव्हीड केअर सेंटरची पहाणी करत तेथील व्यवस्थेसंदर्भात स्थानिक वैद्यकिय अधिकार्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्यासमवेत परळीचे तहसीलदार डॉ विपीन पाटिल, परळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे, परळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ दिनेश कुरमे, डॉ. दिलीप गायकवाड, डॉ संदिप घुगे उपस्थित होते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!