बीड

दुसर्‍या दिवशी अँटीजेन टेस्टमध्ये सापडले 230 कोरोना पॉझिटीव्ह

एकट्या परळीतच 105 बाधीत सापडलेबीड : लॉकडाऊन असलेल्या परळी, अंबाजोगाई, माजलगाव, आष्टी आणि केज या शहरातील व्यापार्‍यांची 18 ऑगस्टपासून अँटीजेन टेस्ट केली जात आहे. पहिल्या दिवशी या पाच शहरात 212 जण कोरोना पॉझीटिव्ह आढळून आले होते, त्यानुसार दुसर्‍या दिवशी या शहरांमध्ये 230 जण कोरोना पॉझिटीव्ह साडपले आहेत. बाधित रूग्णांमध्ये परळी 105, अंबाजोगाई 46, आष्टी 33, माजलगाव 29 आणि केजमधील 17 रूग्णांचा समावेश आहे. काल दिवसभरात 6189 जणांची टेस्ट करण्यात आलेली आहे, त्यापैकी 230 जण कोरोना पॉझिटीव्ह सापडले आहेत. या शहरामध्ये उद्या दि. 20 ऑगस्ट रोजीही दिवसभर अँटीजेन टेस्ट सुरू राहणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!