बीड

कोतवाल पदासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; या तारखेपर्यत करता येणार अर्ज

कोतवाल पदासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ;
या तारखेपर्यंत करता येणार अर्ज
बीड, दि.18 (लोकाशा न्यूज) : कोतवाल पदासाठी अर्ज करण्यास जिल्हा प्रशासनाने मुदत वाढ दिली आहे.
कोतवाल भरती प्रक्रिया 2023 च्या अनुषंगाने कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून सर्व तालुक्यांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. सदर जाहिरातीमध्ये अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिनांक 18/08/2023 हा नमूद करण्यात आलेला आहे. तसेच कोतवाल भरती प्रकियेच्या अर्जासोबत राष्ट्रीयकृत बँकेचा धनादेश खुल्या प्रवर्गासाठी रु.500/- व मागास प्रवर्गासाठी रु.400/- परीक्षा शुल्क म्हणून सादर करणेयायत जाहिरातीद्वारे कळविण्यात आलेले आहे. तथापि, बँकेच्या कार्यालयीन कामकाजाचे दिवस व या महिन्यात आलेल्या शासकीय सुट्टया यामुळे उमदेवारांना डी. डी. (धनाकर्ष काढण्यास अडचणी येत असल्याचे निदर्शनास आल्याने अर्ज दाखल करण्याची मुदत दि.23/08/2023 पर्यंत वाढविण्यात येत आहे. दि.19/08/2023, दि. 21/08/2023 दि. 22/08/2023 व दि.23/08/2023 या दिवशी अर्ज संबंधित तहसील कार्यालयात स्वीकारण्यात येतील.
त्याचबरोबर अर्ज स्वीकारण्याच्या तारखेत झालेल्या बदलामुळे पात्र / अपात्र उमेदवारांची यादी दि. 22/08/2023 ऐवजी दि. 24/08/2023 रोजी संबंधित तहसील कार्यालयाचे तसेच संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे नोटीस बोर्डावर व जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ https://beed.gov.in यावर प्रसिद्ध करण्यात येईल. असे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी आदेशात म्हंटले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!