बीड

बीआरएस पक्षाचा कार्यकर्ता तेलंगणा राज्यामध्ये सुरक्षित नसेल तर महाराष्ट्रामध्ये त्यांच्या सुरक्षेचे काय ?

माननीय मुख्यमंत्री के सी आर साहेबांच्या पंढरपूर दौऱ्याच्या अगोदर पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता ऋतुराज वाघमारे यांच्या मामा चे पिकआप तेलंगणा मधील जगतीयाल जिल्ह्यातील, मालीयाल या ठिकाणी पलटी झाले होते.
संबंधित घटने संदर्भात मदत मागण्यासाठी ऋतुराज वाघमारे आणि त्याचा संपूर्ण परिवार माझ्याकडे आल्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनचे सीआय यांच्याशी मी संपर्क करून मी BRS पक्षाचा महाराष्ट्रातील पदाधिकारी आहे, सदरील पिकप मालक सुद्धा BRS पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे सांगून
संबंधितास आपण कायदेशीर मदत करावी अशी विनंती केली. संबंधित सीआयने मला ऋतुराज वाघमारे आणि त्यांच्या परिवाराला पाठवण्यास सांगितले,
हे लोक तिथे गेल्यानंतर पोलिसांनी त्यांचे मोबाईल काढून घेऊन त्यांना मारहाण करून तुमच्या गाडीमध्ये गांजा टाकू आणि तुम्हाला एनडीपीएस मध्ये अडकवु असे सांगत जबरदस्तीने 60 हजार रुपये घेतले.
याबाबतचे संपूर्ण माहिती मी मा. Kcr साहेबांचे पीए शरदजी मरकड, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस हिमांशूजी तिवारी, कदिर मौलाना साहब माणिक कदम , सोमनाथ थोरात या सगळ्यांच्या कानावर घातले.
एका पिकप चालकासाठी 60000 रु. ही अत्यंत मोठी रक्कम असल्याने, आणि आपण बी आर एस पक्षाचे काम करत असल्याने ते लोक वारंवार माझ्याकडे येऊन संबंधित विषयांमध्ये मदत मागत आहेत.
मी फॉलोअप साठी वारंवार शरदजी मरकड साहेब माणिक कदम यांना फोन केले मात्र त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही जर बी आर एस पक्षाचा कार्यकर्ता तेलंगणामध्ये सुरक्षित नसेल तर महाराष्ट्रातील कार्यकर्त्याला आपण काय संरक्षण देणार आहोत?
या अशा परिस्थितीमुळे पक्षाची प्रतिमा महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांच्या मनामध्ये दुषित होत आहे……

Brs ची महाराषट्रातील ENTRY का?
Brs चे नेमके व्हिजन काय?
Brs मधे लोकांचे प्रवेश कोणती आमिषे दाखवून घेतले जात आहेत?
Brs मधे प्रवेशापुर्वी आणि प्रवेशा नंतर नेत्यांना कशी वागणुक मिळते?
Brs खरंच BJP ची “B” टीम आहे का?
Brs ने दाखवलेले तेलंगना मॅाडेल आणि आम्ही आनुभवलेला तेलंगना यात नेमका फरक काय आहे?

या सर्ह इतर प्रश्नांची ऊत्तरे आज ५ः०० वाजता पत्रकार परीषद घेवून देत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!