बीड आष्टी

दुधात भेसळ करणार्‍या पावडरच्या ट्रकवर अन्न प्रशासनाचा छापा; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड, दि.2 (लोकाशा न्युुज)ः- सध्या दसरा व दिवसाळीचे सण असल्याने बाजारात मिठाई, खावा, बेकरीतील पदार्थांची मागणी वाढत असल्याने पॉवडरने बनलेल्या भसेळ युक्त दुधाची मोठ्या प्रमाणात विक्री होते. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास हाणी होत असल्याने भेसळयुक्त पदार्थ्यााच्या विक्रीला आळत्त बसावा यासाठी अन्न प्रशासनाकडून जिल्हाभरा तपासणी मोहीम राबविण्यास सुरूवात केली. यामध्ये शनिवारी रात्री धोनार्‍याजवळ दुधातील भेसळीसाठी वापरणारी पावडरवर छापा मारत कारवाई केली असून सुमारे 5 लाख 2 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्हयात अवैध गुटखा, भेसळयुक्त पदार्थावरील कारवाईसाठी अन्न प्रशासनाने चांगलाच पुढाकार घेतला असून शनिवारी (दि.1) रात्री आष्टी तालुक्यातील धानोराजवळ दुधातील भेसळीसाठी वापरण्यात येणार्‍या 1700 किलो पावडरचा साठा जप्त करण्यात आला आहे. अन्न प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांच्या मार्गदर्शनखाली अन्न सुरक्षा अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी ही कारवाई केली. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने बाजारात मिठाई, खावा, बेकरीतील पदार्थांची मागणी वाढली आहे.त्यामुळे भेसळयुक्त पदार्थांच्या विक्रीला आळा बसवा यासाठी अन्न प्रशासनाने जिल्हाभर तपासणी मोहीम राबविण्यास सुरुवात केली. शनिवारी (दि.1) रात्री धानोर्‍याजवळ दुधातील भेसळीसाठी वापरणारी पावडर या कारवाईत जप्त करण्यात आली आहे.या पावडरचा वापर दूध घट करण्यासाठी केला जात होता.तसेच बेकरीतील पदार्थांसाठीही या भेसळयुक्त पावडरचा वापर होत असल्याची माहिती अन्न प्रशासन विभागाला मिळाल्यानंतर शेख समीर शेख अकबर (वय-32 रा.धानोरा) यांच्या गोडाऊनवर छापा मारत 25 किलोचे 48 पोते आणि 25 किलोचे 20 पोते असा 1700 किलो पावडरचा मोठा साठा जप्त करण्यात आला. याशिवाय ज्या गाडीतून या भेसळयुक्त पदार्थांची विक्री होत असे ती गाडी (एम.एच.16 सी.सी.7387) ही अंभोरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली असून एकूण 5 लाख 2 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!