बीड

कासाबाई किसनरावजी चव्हाण यांचे निधन

बीड, दि.9(लोकाशा न्युज):- जुन्या पिढीतील मायचा सागर असलेल्या कासाबाई किसनराव चव्हाण यांचे मध्य रात्री 12 वाजुन 05 मिनिटाने वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या निधन समयी त्याचे वय 105 वर्षे होते.
त्यांच्या पश्चात पोमा चव्हाण, पंडित चव्हाण, ग्रा. प. सदस्य पापालाल चव्हाण, पांडुरंग चव्हाण, उपसरपंच शिवाजी चव्हाण असे पाच मुलं तर तीन मुली, नातू, नातवंडे आणि पोतरुंड असा मोठा परिवार असून असून उपसरपंच शिवाजीराव किसनराव चव्हाण यांची आई तर धनंजय गोवर्धन चव्हाण ( प्रबंधक एस पी ऑफिस बीड ), युवराज चव्हाण( गुप्त विभाग बीड), आणि दैनिक लोकाशा उपसंपादक नितीन चव्हाण यांच्या आज्जी होत्या. चव्हाण कुटुंबाच्या दुःखात दैनिक लोकाशा परिवार सहभागी आहे. रविवारी दि. 9 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी ठीक 10 वाजता गोवर्धन नगर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!