गेवराई

क्राईम ब्रँचचे पोलीस असल्याची बतावणी करून व्यापार्‍याला एक लाखांचा गंडा


गेवराई, दि. 13 (लोकाशा न्यूज) : आम्ही क्राईम ब्रँचचे पोलिस आहोत, आम्हाला तुमची चौकशी करायची आहे, असे म्हणून दोन तोतयांनी गेवराई येथील एका आडत व्यापार्‍याला 1 लाख रुपयाला गंडविल्याची घटना मंगळवारी घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान हा सर्व प्रकार मोंढा भागातील जय हनुमान मशिनरीसमोर घडला असून चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, गेवराई येथील महेश कॉलनीत वास्तव्यास असलेले गंगाभिषण बिहारीलाल भुतडा (वय 59 वर्ष) यांचे मोंढा येथे श्रीनिवास भुसार धान्य खरेदीचे दुकान आहे. दरम्यान मंगळवारी भुतडा हे घराकडे जात असताना मोंढा वाटेत त्यांना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अडवून आम्ही क्राईम ब्रँचचे पोलिस आहोत, आम्ही रात्री 5 ते 6 लाखांचा गांजा पकडला आहे. त्यासंदर्भात तुमची चौकशी करायची असून तुम्हाला आमच्या साहेबांनी बोलावले आहे असे म्हणत व्यापारी भुतडा यांच्या गळ्यातील दोन ग्रॅमची चैन, 5. ग्रॅमची अंगठी व नगदी रक्कम असा जवळपास्। लाखांचा मुद्देमाल घेऊन आरोपींनी पोबारा केला. हा सर्व प्रकार मोठा भागातील जय हनुमान मशिनरी समोर घडला असून तेथील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी भुतडा यांच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!