बीड गेवराई

रिक्षाच्या धडकीने उसतोड मजुर ठार; कोळगांव जवळील घटना

कोळगांव- गेवराई तालुक्यातील कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावरील कोळगांव येथे दि.१२ आँक्टोबर रोजी रात्रीच्या वेळेस अँपे रिक्षाच्या जोराची धडक देवुन एका जनास चिरडले. तो उपचार दरम्यान मरण पावला. संबधित रिक्षा चालक फरार झाला आहे. तर या अपघाताच्या घटने नंतर तब्बल चकलांबा पोलिस चार तासाने घटनास्थळी उशीरा पोहचले. नागरिक आणि नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.
गेवराई तालुक्यातील कोळगांव जवळील भिल्लवस्तीवरील उसतोड कामगार रामलिंग शहादेव बर्डे वय ४५ वर्ष यास भिल्लवस्ती कडे जाताना अँपे रिक्षा क्रमांक एम एच १६ ए जी ८४४१ यांनी जोराची धडक देवुन जागीच चिरडलेची घटना दि.१२ आँक्टोबर रोजी रात्री ८:३० मिनटानी घडली हि घटना कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावरील कोळगांव शिवारात घडली. आपघात मरण पावलेल्या व्यक्ती हा स्वतः च्या घरी पायी जात आसताना पाठीमागून रिक्षा येवुन जोराची धडक दिल्याने जागीच ठार झाला, संबधित रिक्षा चालक फरार झाला आहे. या घटने नंतर तब्बल चकलांबा पोलिस चार तासाने घटनास्थळी पोहचले. पोलिसांना फोन करुनही चकलंबा पोलिस घटास्थळी उशीरा पोहचले. नातेवाईकांनी मृतदेह शेवविच्छेदनासाठी बीड जिल्हा रुग्णालयात नेहल्या नंतर पोलिस आल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. अपघातात मृत्यू पावलेल्या उसतोड कामगारास पश्चात चार मुले व पत्नी आहे,शोकाकुल वातावरणात भिल्लवस्ती अंत्यसंस्कार करण्यात आले. घरातील कमावता व्यक्ती आपघात गेल्या कुंटुबिवर उपासमार वेळ आली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!