देश विदेश स्पोर्ट्स

नीरज चोप्राने सोनं लुटलं, भालाफेकीत भारताला सुवर्ण

अ‍ॅथलेटिक्समध्ये पदक जिंकण्यासाठी भारताची 121 वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. भाला फेकणारा नीरज चोप्रा याने या खेळात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. त्याने अंतिम फेरीत 87.58 मीटर थ्रो करत सुवर्ण पटकावले. नीरजने पहिल्या प्रयत्नात 87.03 मीटर आणि दुसऱ्या प्रयत्नात 87.58 मीटर भाला फेकला. त्याने तिसऱ्या प्रयत्नात 76.79 मीटर भाला फेकला, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर फाऊल आणि 6 व्या प्रयत्नात फाउल थ्रो केला.
भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याच्या खेळीकडं भारताच्या नजरा लागल्या होत्या. करोडो भारतीयांचं स्वप्न नीरजनं पूर्ण करत टोकियो ऑलम्पिकमधील पहिलं सुवर्ण पदक भारताला मिळवून दिलं आहे. पहिल्या राऊंडमध्ये 87.03 मीटर लांब भाला फेक करत त्यानं आघाडी मिळवली.  नीरज चोप्रा भारताला यंदाच्या ऑलंम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवून देतो का याकडं सर्वांच लक्ष लागलं होतं, अखेर करोडो भारतीयांचं स्वप्न नीरज चोप्रानं पूर्ण केलं आहे. दुसऱ्या राऊंडमध्ये नीरज चोप्रानं 87.58 मीटर एवढ्याअंतरावर थ्रो फेकला आहे.पहिल्या दोन फेऱ्यांपासून नीरज चोप्रा आघाडीवर होता. दुसऱ्या फेरीत नीरज चोप्रानं फेकलेल्या थ्रोची आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. टोकिओ ऑलिम्पिकमधील आणि भालाफेकीत मिळणारं हे भारतातील पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे.

13 वर्षांनंतर भारताला सुवर्ण
ऑलिम्पिक स्पर्धेत 13 वर्षानंतर भारताला एखाद्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले आहे. यापूर्वी 2008 मध्ये बीजिंग ऑलिम्पिक नेमबाज अभिनव बिंद्राला सुवर्णपदक मिळाले होते. बिंद्राने 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्ण जिंकले होते.

भारताचे आतापर्यंतचे 10 वे सुवर्ण
ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे हे आतापर्यंतचे 10 वे सुवर्णपदक आहे. भारताने यापूर्वी हॉकीमध्ये 8 आणि नेमबाजीमध्ये 1 सुवर्णपदक जिंकले आहे. अशा प्रकारे, हे भारताचे केवळ दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक आहे.

भारताचे सर्वात यशस्वी ऑलिम्पिक
हे भारताचे सर्वात यशस्वी ऑलिम्पिक ठरले आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने 6 पदके जिंकली होती. भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 7 पदके जिंकली आहेत. नीरजच्या सुवर्ण व्यतिरिक्त मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य, पीव्ही सिंधूने बॅडमिंटनमध्ये कांस्यपदक आणि बॉक्सिंगमध्ये लोव्हलिना बोर्गोहेनने कांस्यपदक जिंकले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!