अंबाजोगाई

पंकजाताईंच्या नेतृत्वाने नवी दिशा दिली-आ.नमिता मुंदडा, पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस अंबाजोगाईत विविध उपक्रमांनी साजरा


*फेरीवाल्यांना छत्र्यांचे वाटप,कोरोना योद्धे यांचा सत्कार,*अंबाजोगाई-:पंकजाताईंचे नेतृत्वाने माझ्या राजकीय जीवनाला नवी दिशा दिली.केज विधानसभा मतदार संघात स्व.विमलताई मुंदडा यांंचा राजकीय वारसा चालवताना काळानुरूप परिवर्तन निश्‍चित घडले. पण जेंव्हा मला पंकजाताईंनी पक्षात घेवून उमेदवारी दिली हेच खर्‍या अर्थाने माझे भाग्य. केवळ उमेदवारी नव्हे तर त्यांच्यामुळेच मी आमदार झाले. या शब्दात आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी आपला भावना प्रकट केल्या.               भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस आ.नमिता मुंदडा यांच्या पुढाकारातून विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना आ.नमिता मुंदडा म्हणाल्या की मी आमदार झाल्यापासून माझा जास्त स्नेह ताईंशी त्यांच्याशी वाढला असून एकूणच त्यांच्या स्वभावाचे पैलू आणि नेतृत्वाची कसोटी आता मला कळून चुकली आहे. त्यांच्याकडे विकासाची केवळ दृष्टी नव्हे तर फार मोठे व्हिजन आहे. नेहमी चर्चा करताना विकासाच्या प्रश्‍नाशिवाय चर्चा असू शकत नाही. खरं तर त्यांच्या आशिर्वादाने मला राजकारणात संधी मिळाली. माझे यजमान अक्षय यांना आईच्या दुर्देवी निधनानंतर पंकजाताईंनी मायेची सावली सतत दिल्याचा मला अनुभव आला आहे. आम्ही भाजपमध्ये नसतांना ही अगदी लहानपणापासूनचा कौटुंबिक स्नेह त्यांनी कधीच तोडला नाही. खरं तर राष्ट्रवादी पक्षात असताना ते केवळ पंकजाताईकडे बघुन भाजपात प्रवेश केला आणि त्यांच्यामुळेच या मतदार संघात प्रचंड मताने मी निवडून आले. वर्तमान राजकारणात सत्ताधार्‍यांचे काम मी नेहमीच डोळ्याचे पाहते. ज्या प्रकारे राजकारणात आडवाआडवी केली जाते. तसले राजकारण पंकजाताईंनी कधीच केले नाही. वंचित, उपेक्षित, शेतकरी, कष्टकरी, दिनदलित आदि वर्गात सर्वसामान्य लोकांचा आवाज म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहतो. त्यांच्यातली निर्णय क्षमता अफाट आहे. संयम पण स्पष्ट भूमिका त्या नेहमीच घेतात. अलिकडच्या काळात आठ दिवसातून एक-दोन वेळा भेटल्याशिवाय आम्ही राहत नाही. विकासाची भूक असणारे नेतृत्व राजकारणात असेल तर त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होतो. कारण पालकमंत्री म्हणून त्यांनी बीड जिल्ह्याचे सर्वांगिण केलेला विकास सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. खा.प्रितमताई असो किंवा मोठ्या ताई असो केवळ विकास आणि विकास हाच त्यांच्या डोक्यात असतो. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देताना भविष्य उज्वल असावे आणि आमच्या ताईसाहेब पुन्हा सत्तेच्या सिंहासनावर बसाव्यात यासाठी योगेश्वरी चरणी त्यांनी प्रार्थना केली. कोरोना संकटात केज मतदार संघात सर्वसामान्य रूग्णांना मदत करताना पंकजाताईची सामाजिक संवेदना किती जागृत असते हे मी डोळ्याने पाहिले. त्यांच्यातली शिस्त आणि कठोर भूमिका याचा ही अनुभव अनेकदा येतो. भविष्यात त्यांच्या पाठीमागे आम्ही मुंदडा परिवार खंबीरपणे उभा राहील असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.           यावेळी आ.नमिता मुंदडा,भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत  श्री, योगेश्वरी देवीस महाआरती करण्यात आली.तसेच अंबाजोगाई शहरातील फेरीवाल्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. कोविड-19 च्या काळात अंबाजोगाई शहरात उत्कृष्ट काम केलेल्या अशा वर्कर्स यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी प भाजपाचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, जेष्ठ नगरसेवक शेख रहीम भाजपा चे तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे, नगरसेवक सारंग पुजारी, भाजपा चे प्रवक्ते राम कुलकर्णी, आनंत लोमटे, सुरेश कराड, संतोष लोमटे, दयावान मुंडे, नूर पटेल, कल्याण काळे, प्रशांत आदनाक , विकास मुंडे, शरद इंगळे, अरसुडे,अहेमद पप्पूवाले, व्यंकट किर्दंत, अमोल पवार,महेश आंबाड, अप्पा कदम, सचिन केंद्रे , श्री डांगे, सुजित ठाकूर, बाळू सारडा, शेख सुजात, गंभिरे, दीपक कोरडे, शरद लाड, राहुल मोरे, मुंडे, वाघमारे, फैज भाई यांच्यासह भाजपा चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!