अंबाजोगाई

श्रावण महिन्यात तरी बंदिस्त मंदिरे खुले करून पुजाऱ्यासह लघुउद्योजकांची काळजी घ्यावी-प्रवक्ते राम कुलकर्णी यांची मागणी

अंबाजोगाई (प्रतिनिधी)कोरोना संकटामुळे धार्मिक स्थळे,मंदिरे सरकारने बंदिस्त ठेवली आहेत.कोरोनाचा प्रभाव कमी होताच अनेक गोष्टी नियमाचे पालन करून सुरू केल्या.तरीही पुन्हा प्रादुर्भाव वाढत आहे.मात्र अशा परिस्थितीत दोन वर्षापासुन बंदिस्त मंदिरे ज्यावर आधारित पुजाऱ्यासह परिसरात बसणारे लघुउद्योजक यांची उपासमार सुरू आहे.सरकार आर्थिक मदत करायला तयार नाही.दुसऱ्या बाजुने मंदिरे उघडायला तयार नाहीत.श्रावण महिना पवित्र म्हणुन ओळखला जातो.सरकारने किमान नियमाचे पालन करून हे सारं लक्षात घेता मंदिरांची दारे उघडावीत अशी मागणी भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे.

प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात भाजपा प्रवक्ते कुलकर्णी यांनी म्हटले आहे की,कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मागच्या एक दिड वर्षापासुन मंदिरं बंद आहेत.कोरोना संकट कमी होते.मध्येच वाढते. आता पुन्हा तिसरी लाट येवु घातली आहे.मात्र सरकार नियमाचं पालन करत वेगवेगळ्या उपक्रमासाठी परवानगी देत आहे. उदाहरणार्थ – शाळा,महाविद्यालये,जीम,लग्न कार्यालय किंवा अन्य ठिकाणी गरजेनुसार वेगवेगळ्या नियमात सुट दिली.अर्थात सामाजिक व्यवस्था सुरूळीत करण्याचा प्रयत्न ज्यातुन अनेक ठिकाणी दिलेली सुट धोका सुद्धा होत आहे.मात्र अध्यात्मिकदृष्ट्या खऱ्या अर्थाने संकटे दुर करण्यासाठी भाविक भक्तांची श्रद्धा महत्वाची असते.मात्र राज्यातील सरकार धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली अगदी पंढरपुरच्या विठोबालासुद्धा यात्रेला परवानगी देत नाही हे दुर्दैव.विठोबाच्या दारात सरकारने विधानसभेची पोटनिवडणुक घेतली.मात्र कोरोनाच्या नावाखाली बंदिस्त केलेल्या विठोबाला खुले केलं नाही.त्यापेक्षा अधिक राज्यात प्रत्येक शहरात,जिल्ह्यात, तालुक्यात वेगवेगळी तीर्थक्षेत्रे आहेत.ज्यावर आधारित लाखो लोकांचे पोट आहे.मग, देवालयातील पुजारी असो किंवा परिसरात बसणारे लघु उद्योजक असोत.अगदी गोरगरीब मंदिराच्या दारात पोट भरण्यासाठी बसत असतात.मंदिरे बंद असल्यामुळे या सर्वांची उपासमार आणि संसारिक अवहेलना आर्थिकदृष्ट्या होत आहे.खरं तर सरकारने पुजाऱ्यांसह अशा गोरगरीबांना आर्थिक मदत करायला हवी.पण, सरकार मध्ये संवेदनशीलता कमी आहे.सामाजिक जाणिवतेचा अभाव ठाकरे सरकारमध्ये असल्याने कुठली ही दयामाया सरकारला येत नसल्याचा आरोप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला.आता श्रावण महिना जो पवित्र म्हणुन ओळखला जातो.खरे तर या महिन्यात पुजा पाठ मोठ्या प्रमाणावर केले जातात.भाविक भक्त वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रावर दर्शनासाठी जातात.सरकारने अनेक गोष्टी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून सुरू केल्या मग बंदिस्त केलेल्या मंदिराला उघडायला परवानगी का नाही ? हा सवाल त्यांनी केला.वर्तमानकाळाची गरज लक्षात घेता कोरोना प्रतिबंधक नियमाचं पालन करून राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने मंदिरं उघडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.ज्या सरकारने आषाढी यात्रेला परवानगी दिली नाही.एवढेच नव्हे तर पायी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या खांद्यावर असलेली पताका पोलीस यंत्रणेचे बळ वापरून काढुन घेतल्या.त्यापेक्षाही अधिक वारकऱ्यांच्या ड्रेसवर सुद्धा विठ्ठलाच्या दर्शनासाठी सुद्धा जावू दिले नाही.त्या सरकारकडून अपेक्षाही नाहीत.पण, किमान आता मंदिर परिसरातील गोरगरीबांच्या पोटाची काळजी म्हणुन तरी सरकारने मंदिरे खुली करावीत अशी मागणी त्यांनी केली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!