अंबाजोगाई

आशा सेविकांचे प्रश्न प्राधान्याने विधानभवनात मांडणार-आ.नमिता मुंदडा,सर्व आशा सेविकांची झाली आरोग्य तपासणी

अंबाजोगाई-:आशा सेविकांची मानधन वाढ,त्यांना सेवेत कायम कसे करता येईल.या साठी शासनदरबारी पाठपुरावा करून त्यांचे प्रश्न विधानभवनात मांडण्यासाठी मी कटिबद्ध आहे.अशी ग्वाही केज विधानसभा मतदार संघाच्या आ.नमिता अक्षय मुंदडा यांनी दिली.
लोखंडी सावरगाव येथील वृद्धत्व आरोग्य व मानसिक आरोग्यकेंद्र येथे अंबाजोगाई तालुक्यातील आशा सेविकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मार्गदर्शन करताना आ.नमिता मुंदडा बोलत होत्या. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी लातुर येथील आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले,वृद्धत्व रुग्णालयाचे अधीक्षक डॉ चंद्रकांत चव्हाण,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बालासाहेब लोमटे यांची उपस्थिती होती.
या वेळी बोलताना आ. नमिता मुंदडा म्हणाल्या की वृद्धत्व आरोग्य व मानसिक आरोग्य केंद्र व स्त्री रुग्णालयाने कोरोना काळात खूप कौतुकास्पद काम केले.आता वृद्धत्व आरोग्य केंद्र नॉन कोव्हीड रुग्णांसाठी काम करणार आहे. अशावेळी रुग्णसेवा देत असताना निर्माण होणाऱ्या त्रुटीवर मात करता आली पाहिजे.बाहेरगावाहून येणाऱ्या रुग्णांसाठी रुग्णालय परिसरात परिपूर्ण उपहारगृह औषधी उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना झाली पाहिजे.आशा सेविकांच्या माध्यमातून या रुग्णालयात होणारे उपचार यांची माहिती रुग्णांपर्यंत पोहोंचली पाहिजे.रुग्णसेवेचा लाभ सामान्य रूग्णांना कसा मिळेल.या बाबत सर्वरोग निदान शिबीर व विविध उपक्रम राबविण्यात यावेत.अशा सुचना आ.मुंदडा यांनी केल्या.आशा सेविकांशी मनमोकळी चर्चा करून त्यांचे प्रश्न व समस्या त्यांनी समजून घेतल्या.
या वेळी आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले यांनी आशा सेविकांना ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार रुग्णसेवा कशी उपलब्ध करून देता येईल या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.वृद्धत्व रुग्णालयाच्या माध्यमातून परिसरातील रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी शासन स्तरावर आपण सर्वोतोपरी मदत करणार आहोत.हे रुग्णालय ग्रामीण भागातील रुग्णांसाठी आधारकेंद्र ठरले पाहिजे या दृष्टिकोनातून सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी काम करावे.व दर्जेदार रुग्णसेवा कशी देता येईल यासाठी प्रयत्न करावेत.रुग्णसेवेचा अंबाजोगाई पॅटर्न निर्माण करा.अशा विविध सुचना त्यांनी केल्या.
या वेळी अधीक्षक डॉ. चंद्रकांत चव्हाण यांनी रुग्णालयात उपलब्ध असणाऱ्या सुविधाची माहिती दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका आरोग्य अधिकारी डॉ बालासाहेब लोमटे यांनी केले.

आशांची झाली आरोग्य तपासणी

या बैठकीला उपस्थित असणाऱ्या सर्व आशा सेविकांची आरोग्य तपासणी यावेळी करण्यात आली. रक्तदाब,रक्तशर्करा,ईसीजी तपासणी करून आशा सेविकांना निरोगी ठेवण्यासाठी दर सहा महिन्याला हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे यांनी सांगितले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!