बीड

आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या महाआरोग्य शिबीराचा मराठवाड्यातील गरजुंना आधार मिळेल-आ.प्रकाश सोळंके, अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त अँजिओप्लास्टी,अँजिओग्राफी शिबीराचे उदघाटन अँजिओग्राफी,अँजिओप्लास्टी याशिबीराचा लाभ घ्या- माजी आ.अमरसिंह पंडित


बीड (प्रतिनिधी):- आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या संयोजनातून महिनाभर चालणार्‍या अँजिओग्राफी,अँजिओप्लास्टी मोफत तपासणी महाआरोग्य शिबीर बीड नव्हे तर मराठवाड्यातील हृदय रूग्णांसाठी आधार ठरेल असे प्रतिपादन माजी मंत्री आ.प्रकाश सोळंके यांनी केले. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त काकू-नाना मेमोरिअल हॉस्पिटल येथे आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. नागरीकांना आरोग्याच्या चांगल्या सेवा मिळाल्या पाहिजेत यासाठी आ.संदिप भैय्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू असतात. काकू-नाना हॉस्पिटलची उभारणी करून पुणे, मुंबई, औरंगाबाद येथे मिळणार्‍या आरोग्याच्या सेवा त्यांनी बीडमध्ये उपलब्ध करून दिल्या. कोव्हिड काळातही चांगले काम केले. या शिबीराचा गोरगरीब रूग्णांना लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी माजी आ.अमरसिंह पंडित यांनी केले आहे.
बुधवार दि.21 जुलै रोजी सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त काकू-नाना मेमोरीअल हॉस्पिटल व स्व.मोतीरामजी वरपे कार्डियाक युनिट जालना रोड बीड येथे मोफत अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी या मराठवाडास्तरीय मोफत महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन आ.प्रकाश सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी  राष्ट्रवादीचे नेते माजी आ.अमरसिंह पंडित, आ.बाळासाहेब आजबे, आ.संजय दौंड, अशोक डक, महेबुब शेख, डॉ.नरेंद्र काळे यांची विशेष उपस्थिती होंती. माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, माजी आ.उषाताई दराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे, संचालक डॉ.बालाजी जाधव, संचालक अजित वरपे, डॉ.अमित दुल्लरवार, डॉ.समीर शेख, डॉ.आळणे, डॉ.सचिन आंधळकर आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक मांडतांना आ.संदिप भैय्या क्षीरसागर म्हणाले की, हे शिबीर महिनाभर चालणार असून यात दररोज 10 रूग्णांपर्यंत तपासणी केली जाणार आहे. आत्तापर्यंत 200 पेक्षा अधिक रूग्णांनी नोंदणी केली आहे. नोंदणी जेवढ्यांनी केली तेवढ्यांची मोफत अँजिओप्लास्टीकरून आवश्यक रूग्णांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. काकू-नाना मेमोरीअल हॉस्पिटलच्या माध्यमातून रूग्णांची सेवा करत आहोत. कोव्हिड काळातही सातत्याने बेड, ऑक्सिजन, औषधे आदी कामे माझ्यासह आमच्या टीमने केली आहेत. यापुढेही करत राहू, तिसरी लाट येवू नये ही ईश्वराकडे प्रार्थना. बीडच्या जनतेच्या सेवेत कधीच कमी पडणार नाहीत, विश्वासाला तडा जावू देणार नाही अशी ग्वाही ही यावेळी त्यांनी दिली. यावेळी मनोगत व्यक्त करतांना शिबीराचे कौतुक करत डॉ.नरेंद्र काळे, आ.संजय दौंड यांनी शुभेच्छा दिल्या. तर आ.बाळासाहेब आजबे म्हणाले की, आ.संदिप भैय्या सातत्याने जनतेच्या सेवेसाठी नवनवीन उपक्रम घेवून अनेक सुविधा ते खेचून आणत आहेत. मंत्रालयातील कामे असतील, विकास निधी असेल ते नेहमी पुढे असतात. कोव्हिड काळातही लोकांच्या सेवेत ते पुढे होते. या शिबीराच्या माध्यमातून माझ्या मतदार संघातीलही रूग्णांना फायदा होईल असे प्रतिपादन त्यांनी केले. चांगल्या कामाचं कौतुक केलं पाहिजे, काकू-नाना हॉस्पिटल आणि आ.संदिप भैय्या सातत्याने चांगले उपक्रम घेतात. शिबीराचा गरजु रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन माजी आ.अमरसिंह पंडित यांनी केले. या शिबीराच्या अध्यक्षस्थानावरून बोलतांना आ.प्रकाश सोळंके म्हणाले की, आ.संदिप भैय्यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणारे हे आरोग्य शिबीर, हा उपक्रम चांगला असून त्याचा गोरगरीब रूग्णांना फायदा होईल. बीडसह मराठवाड्यातील गरजुवंतांना हॉस्पिटलपर्यंत कार्यकर्त्यांनी पोहचवाव असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्ञानेश्वर काशिद यांनी केले तर आभार काकू-नाना मेमोरीअल हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी डॉ.बशीर शेख यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी ज्ञानेश्वर कुलकर्णी, डॉ.विष्णु चोले, डॉ.यादव अशोक, डॉ.सोमवंशी, डॉ.विकास सानप, अतुल वालेकर, नाना वडमारे यांच्यासह काकू-नाना मेमोरीयल हॉस्पिटल व मोतीरामजी वरपे कार्डियाक युनिटच्या टीमने परीश्रम घेतले. 
चौकटनोंदणी केलेल्या सर्व रूग्णांची तपासणी होणार -आ.संदिप भैय्या क्षीरसागरअजित दादांचा वाढदिवस साधे पणाने साजरा करण्याची सूचना याच निमित्ताने सामाजिक उपक्रम राबवत असतांना अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टीचे मोफत तपासणी शिबीराचे आयोजन केले आहे. शिबीराला चांगला प्रतिसाद असून दिडशेपेक्षा अधिक रूग्णांची नोंदणी झालेली आहे. नोंदणी झालेल्या सर्व रूग्णांवर तपासणी आणि आवश्यक त्या ठिकाणी मोफत शस्त्रक्रिया देखिल केल्या जाणार आहेत. बीडकरांच्या सेवेत कधीच कमी पडणार नाही. आदरणीय दादांनी बीडसाठी 200 खाटांचे रूग्णांलय मंजुर करून दिले. लवकरच तेही रूग्णांच्या सेवेत सुरू होईल. कोव्हिड काळात काम करत असतांना सामजिक कामातही नेहमी अग्रेसर राहिलो. यापुढेही बीडकरांच्या सेवेत कमी पडणार नाही अशी ग्वाही यावेळी काकू-नाना मेमोरीअल हॉस्पिटलचे संचालक आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी दिली. 
चौकटआ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी दिल्या दोन रूग्णवाहिकाआ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी आपल्या स्थानिक निधीतून दोन कार्डियाक रूग्ण वाहिका बीड जिल्हा रूग्णालयासाठी दिल्या आहेत. दोन्ही या रूग्ण वाहिका बीड जिल्हा रूग्णालयात लवकरच दाखल होणार असून याचा जिल्ह्यातील रूग्णांना फायदा होईल. या रूग्णवाहिकेमध्ये अत्याधुनिक सुविधा असणार आहेत.
चौकटकाकू-नाना हॉस्पिटलच्या टीमचे कौतुककाकू-नाना मेमोरील हॉस्पिटल व स्व.मोतीरामजी वपरे कार्डियाक युनिट येथील लहान मुलांसाठी असलेला अत्याधुनिक कक्ष जिल्हा रूग्णालयासाठी देण्यात आला आहे. येथील डॉ.समीर शेख, कार्डिओलॉजीस्ट डॉ.अमित दुल्लरवार, यांच्यासह हॉस्पिटलमधील टीमचे शिबीराच्या उद्घाटनासाठी आलेल्या मान्यवरांनी कौतुक केले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!