बीड

हक्काचे ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी बांधवांनी जागृक होऊन एकत्र येणे आवश्यक, माजलगावमध्ये आरक्षण पे चर्चा कार्यक्रमात अ‍ॅड. सुभाष राऊत यांनी अनेक मुद्यांकडे लक्ष वेधले


माजलगांव, दि. 21 (लोकाशा न्यूज) : कोण लहान, कोण मोठे याचा विचार न करता राजकीय पक्षाचे जोडे बाजूला ठेऊन आता एकत्र येण्याची वेळ आली आहे. हक्काचे ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी ओबीसी समाज बांधवांनी जागृक होऊन एकत्र यावे, राज्य आणि केंद्र स्तरावर ओबीसीचे नेते ना. भुजबळ साहेब प्रयत्नशील आहेत. त्यांना बळ देण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष ड.सुभाष राऊत यांनी केले आहे.
माजलगांव येथे ओबीसी आरक्षण पे चर्चा याकार्यक्रमाच्या माध्यमातून ओबीसी समाजातील विविध प्रकारच्या मागण्या, आरक्षण संदर्भात  दि. 21 जुलै रोजी बुधवार रोजी सकाळी 11 वाजता  व्यंकटेश हॉल माजलगांव येथे सकळ ओबीसी समाज बांधवाच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी ओबीसी जातीनिहाय जनगणना, ओबीसी समाजाच्या विविध मागण्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण पुर्ववत करण्यात यावे, केंद्र शासनाच्या नीट मेडिकल प्रवेश पूर्व परीक्षेतील ओबीसी विद्यार्थ्यांचे रद्द केलेले आरक्षण पूर्ववत करावे आदी मागण्यासंदर्भात अ‍ॅड. सुभाष राऊत जिल्हाअध्यक्ष अ. भा. महात्मा फुले समता परिषद, प्रा.पी.टी.चव्हाण मा.जि.प.सदस्य तथा बंजारा समाज नेते, डॉ.नागेश गवळी प्रदेश प्रचारक अ.भा.महात्मा फुले समता परिषद,जे.डी.शहा, गणेश जगताप प्रदेशाध्यक्ष म. रा.परीट समाज धोबी सेवा मंडळ,, कल्याणराव आबुज असासभापती जिल्हा परिषद सदस्य बीड, अर्जुन दळे जिल्हाअध्यक्ष कुंभार समाज आदींनी मार्गदर्शन केले.या वेळी माजी जि.प.सदस्य शिवप्रसाद खेत्रे, दिंद्रुडचे सरपंच कोमटराव, अजय शिंदे, ज्ञानेश्वर कोरडे, अनिल हिवरकर, अशोक शिंदे, जगन खेत्रे, राजाभाऊ कटारे, राम कटारे, अशोक शिंदे, सावता रासवे यांची प्रमुख उपस्थिती होती. ओबीसी आरक्षण पे चर्चा  बैठकीत बोलताना ड.सुभाष राऊत  पुढे म्हणाले की, आता ओबीसी समाज बांधवानी झोपेचे सोंग -ढोंग बाजुला ठेऊन आबीसी आरक्षणासह इतर मागण्यासाठी आता सरकारवर हल्लाबोल केल्याशिवाय पर्याय नाही. ओबीसीचा शत्रू कोण आणि मित्र कोण आता आपण ओळखले पाहिजे. ओबीसी समाजाच्या विविध मागण्यासह ओबीसीची जातिनिहाय जनगणना होणे आवश्यक आहे . ओबीसीचे आरक्षण पदरात पाडण्यासाठी सर्व ओबीसी समाज बांधवांनी आता एकत्र येण्याची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण पुर्ववत करणे,ओबीसी जातनिहाय जनगणना तात्काळ होणे गरजेचे असून जेणेकरून ओबीसीचे प्रमाण व त्याचे अधिकार त्यांना मिळतील.ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील राजकीय आरक्षण तात्काळ लागू व्हावे, जातिनिहाय जनगणना करण्यात यावी, केंद्र शासनाच्या नीट मेडिकल प्रवेश पूर्व परीक्षेतील ओबीसी विद्यार्थ्यांचे रद्द केलेले आरक्षण पूर्ववत करण्यात यावे, तसेच ओबीसी समाजाचे विविध प्रकारच्या समस्या आहेत. ओबीसी समाज हा मागासलेला, शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आलेला नाही, मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होत नाही, ओबीसी समाज दिवसेंदिवस मागास होत आहे. ओबीसी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण, नोकरी, राजकारणात राखीव जागा असणे गरजेचे आहे. त्यामुळे ओबीसी समाज हा हाळुहाळु मुख्य प्रवाहात येईल. यावेळी सर्व  पदाधिकारी, नगरसेवक,  सरपंच, प.स.सदस्य, बूथ प्रमुख,  प्रभारी, कार्यकर्ते व सकल ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित  होते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!