गेवराई

गेवराईतील बागपिंपळगावात चोरट्यांचा धुमाकुळ, पोस्ट ऑफीस फोडले, कार्यालयातील वस्तूसह कागदपत्राची नासधूस, तर त्या नागरिकाच्या घरातील दागिन्यांसह लाखो रूपयांचा ऐवज लंपास



गेवराई : अज्ञात चोरट्यांनी घरातील मंडळी गाढ झोपेत असल्याचा फायदा घेऊन दागिन्यांसह लाखो रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास करत पोस्ट कार्यालयात वस्तूची नासधूस करुन महत्त्वाचे कागदे अस्ताव्यस्त करून पोबारा झाल्याची घटना बुधवार दि.16 रोजी पहाटे तालुक्यातील बागपिंपळगाव येथे घडली. गेवराई तालुक्यात चोरीचे प्रमाण वाढले असून तालुक्यातील बागपिंपळगाव रहिवासी बैबी छोटु शेख नेहमी प्रमाणे आपल्या कुटुंबासह रात्रीच्या वेळी गाढ झोपेत असताना बुधवार दि.16 रोजी पहाटे चोरट्यांनी घरात प्रवेश करुण दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा बागपिंपळगाव येथील पोस्ट कार्यालयाकडे वळवून त्यातील वस्तू व कागदपत्राची नासधूस केली. सकाळी बैबी छोटु शेख हे झोपेतून उठून पाहिल्यास त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोस्ट कार्यालय उघडल्यानंतर तेथील वस्तूची नासधूस झाल्याचे व महत्त्वाचे कागदपत्रे गायब झाल्याचे दिसून आले. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक टाकसाळ व पोलीस खरात यांनी जाऊन पंचनामा केला.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!