बीड गेवराई

उजव्या कालव्यात स्कॉर्पियो बुडाल्याने एक ठार एक गंभीर जखमी ; गेवराई तालुक्यातील रेवकी फाटा येथील घटना

गेवराई – तलवडा रोडवरील रेवकी फाट्या जवळील जायकवाडी उजव्या कालव्याच्या पाण्यात स्कॉर्पियो पडुन एक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
संगम जळगाव येथील दोघे मित्र स्कॉर्पियो गाडीने गेवराई शहरातकडे येत होते. दि १८ शुक्रवार रोजी रात्री ११वा दरम्यान गाडी चालवत असतांना कालव्याच्या कठाड्याचा अंदाज न आल्याने कालव्यात पडली पाणी आसल्यामुळे गाडी वाहत बुडाली यात ‘राजेश रामकिसन जायभाय, वय वर्ष२२ रा संगम जळगाव याचा बुडुन मृत्यु झाला तर सोबत त्याचा मित्र ‘सखाराम नागरे, गंभीर जखमी झाला आसुन रात्री परिसरातील नागरीकांना घटनेची माहीती झाल्यावर बचाव कार्य सुरु केले. यावेळी दोघांना पाण्यातुन काठण्यात यश आले परंतु राजेश जायभाय याचा बुडुन मृत्यु झाला आहे. पार्थीवाचे शवविछेदन करण्यात आले आसुन मृतदेह कुटुबाकडे देण्यात आला आहे मित्र सखाराम नागरे बचावला असुन गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत या घटने मुळे गावात शोककळा पसरली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!