गेवराई : गेवराई तहसील कार्यालयात अनेक अधिकारी व कर्मचारी यांची पदे रिक्त होती तसेच तहसिलदार धोंडीबा गायकवाड हे रजेवर गेल्याने नायब तहसीलदार जाधवरकडे पदभार होता परंतू तेही रजेवर गेल्याने नायब तहसीलदार सुहास हजारे यांनी प्रभारी तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारला असून मागील वर्षी प्रशासकीय सेवेत उत्कृष्ट कामगिरीबद्दल उत्कृष्ट अधिकारी म्हणून पुरस्कारासाठी त्यांची निवड झालेली आहे. सुहास हजारे यांनी तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या माध्यमातून गेवराई तहसिल कार्यालयातील सर्वसामान्यांची खोळंबलेली कामे मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नायब तहसिलदार सुहास हजारे यांनी गेवराई तहसीलच्या रिक्त तहसिलदार पदाचा प्रभारी तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारला असून त्यांनी याआधी धारूर येथे नायब तहसिलदार महसूल 1या पदावर कामकाज केले. तसेच प्रभारी मुख्याधिकारी म्हणून धारुर नगरपरिषद 2 वर्ष कामकाज केले. दरम्यान काही दिवसांपूर्वी ते गेवराई येथे नायब तहसीलदार महसूल 2 या पदावर नियुक्ती झाल्याने रुजू झाले आहेत. तसेच गेवराईचे तहसीलदार रजेवर गेल्याने प्रभारी तहसिलदार पदाचा पदभार सुहास हजारे यांनी घेतला असून त्यांच्या माध्यमातून येथील तहसिल कार्यालयातील सर्वसामान्यांची खोळंबलेली कामे मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.