धारूर

धारूरमध्ये आणखी एक चोरी, चोरट्यांनी महिलेवर केला धारदार शस्त्राने वार


धारूर : धारूर शहरात सलग दुसर्‍या दिवशी चोरीची घटना घडली आहे. येथील आझादनगर भाग असलेल्या परिसरात पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने घरात घुसत धारदार शस्त्राने महिलेवर वार करत चोरी केल्याची घटना घडली आहे. महिलेस पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वराती येथे पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरेखा धस करत आहेत.
शहराच्या जवळच असणार्‍या चिंचपूर रोड येथे असणार्‍या एका आश्रमात सोमवारी रात्री चोरट्यांनी चोरी केल्याची घटना ताजी असताना शहरातील आझादनगर भागात बुधवारी पहाटेच्या सुमारास जबरी चोरीची घटना घडली आहे. याठिकाणी चोरीसाठी आलेल्या चोरट्यांनी धारदार शस्त्र घेऊन घरात प्रवेश करत महिलेवर शस्त्रांनी वार करत चोरी केली आहे. या महिलेस धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचारासाठी पाठवण्यात आले आसता आवश्यक असणार्‍या पुढील उपचारासाठी या महिलेस अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
या घडलेल्या प्रकरणाचा तपास धारूर ठाण्याच्या ठाणेदार एपीआय सुरेखा धस या करित आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!