धारूर

मुलीच्या मारहाणीचा जाब विचारला; सासूवर जावयाचा कोयत्याने हल्ला धारूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


धारूर : मुलीला मारहाण केल्याचा जाब विचारला म्हणून जावयाने सासूवर कोयत्याने हल्ला केला. ही घटना धारूर तालुक्यातील पहाडी दहिफळ येथे 23 ऑगस्ट रोजी घडली.

छाया दिलीप गवळी (45, रा.फुलेनगर, धारुर) असे कोयत्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सासूचे नाव आहे. रविवारी त्यांचा जावई धम्मानंद मिटू मस्के (रा.पहाडी दहिफळ) याने त्याच्या पत्नीला घरगुती कारणावरून जबर मारहाण केली होती. याची माहिती छाया गवळी यांना मिळताच त्यांनी थेट मुलीचे घर गाठले. तेथे त्यांनी मुलीला विनाकारण मारहाण का करता, असा जाब जावई धम्मानंद याला विचाला. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली. याचा राग आल्याने धम्मानंद मस्के याने छाया गवळी यांच्या डोक्यात जोरात कोयता मारुन जखमी केले. तर, इतरांनाही मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यात सासू छाया गवळी गंभीर जखमी झाल्या. त्यांनी धारूर ठाणे गाठत दिलेल्या तक्रारीवरून धम्मानंद मस्केविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!