धारूर बीड

धारूर येथील सामाजिक वनीकरण कार्यालयाला ध्वजारोहनाचा विसर

तहसील कार्यालयाकडून पंचनामा

धारूर – धारूर येथील सामाजिक वनीकरण कार्यालय सुरू होऊन ही या कार्यालयात प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण न झाल्याच्या तक्रारी वरून तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी यांनी या कार्यालयाचा पंचनामा केला. वरिष्ठ कार्यालयाकडून आपल्याला साहित्याचा पुरवठा करण्यात न आल्याचे व शेजारील शाळेत आपण ध्वजारोहणास उपस्थित असल्याचे पंचनाम्यात सांगितले आहे.
धारूर येथे ऑगस्ट 2020 मध्ये सामाजिक वनीकरणचे कार्यालय सुरू झाले हे कार्यालयात वनक्षेञ अधिकारी व वनरक्षक ही दोन पदे आहेत. हे कार्यालय प्रजासत्ताक दिनी चांगलेच चर्चेत आले. या दिवशी या कार्यालयात राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण झाले नसल्याची तक्रार तहसीलदारांकडे गेली. तहसीलदार वंदना शिडोळकर यांनी तात्काळ मंडळ अधिकारी नजिर खुरेशी यांना या कार्यालयाचा पंचनामा करण्यास पाठवले त्यांनी आडस रोडवर भाड्याचे जागेत असणारे ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष त्यांनी पंचनामा केला असता या कार्यालयात वनक्षेञ अधिकारी जे आर भांगे हे उपस्थित होते. त्यांनी यावेळी वरीष्ठ कार्यालयाकडून आपणास कुठलेच साहित्य पुरवले नसल्याचे सांगितले शेजारील शाळेत आपण ध्वजारोहणास उपस्थित होतो असे पंचनाम्यात सांगितले असल्याचे मंडळ अधिकारी नजिर खुरेशी यांनी सांगितले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!