बीड

अन् पोलिसांनी सोडून दिलेला गुटख्याचा टेम्पो एसपींनी जाब विचारताच दोनच तासात ठाण्यात आला


बीड, दि. 25 (लोकाशा न्यूज) : पेठ बीड पोलिसांनी गुटख्याचा टेम्पो सोडून दिल्याची बातमी माध्यमांमध्ये पसरताच पोलिस अधीक्षक आर रामस्वामी यांनी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांना पाचारण करून विचारणा केली, त्यानंतर तातडीने चक्र फिरली आणि दोन तासात गुटख्याचा टेम्पो ठाण्यात लावण्यात आला. मात्र सायंकाळ पर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
बीड शहरातील आदित्य कॉलेज जवळ गुटख्याचा टेम्पो लोकांनी पकडला आणि पेठ बीड पोलिसांना याची माहिती दिली. मात्र कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी टेम्पोच सोडून दिला.याची माहिती मिळाल्यानंतर माध्यमांनी त्यासंदर्भात बातमी केली, या बातमीची दखल घेत पोलिस अधीक्षक आर रामस्वामी यांनी तातडीने पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांना बोलावून घेत जाब विचारला. त्यानंतर अवघ्या दोनच तासात सोडून दिलेला हा टेम्पो पोलीस ठाण्यात लावण्यात आला.

टेम्पो सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास लावला असला तरी सायंकाळी सात वाजेपर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. गुटख्याचा टेम्पो सोडून दिल्यानंतर पुन्हा कोणत्या भागातून तो ताब्यात घेतला,त्यात किती माल आहे,कोणाला ताब्यात घेतले याबाबत अद्याप तरी कोणतीही माहिती पोलिसांकडून प्राप्त झालेली नाही.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!