बीड

28 जानेवारीला खा. प्रीतमताई घेणार नगर-बीड रेल्वे मार्गाच्या भुसंपादनाबाबत बैठक


बीड, दि. 23 (लोकाशा न्यूज) : नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी सातत्याने प्रयत्न करणार्‍या खा. प्रीतमताई मुंडे येत्या 28 जानेवारी रोजी या मार्गाच्या भुसंपादनाबाबत रेल्वे आणि महसूल विभागाची एक महत्वाची बैठक घेणार आहेत. ही बैठक जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी एकच्या सुमारास होणार आहे.

खा. गोपीनाथराव मुंडे यांच्यानंतर नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी तत्कालिन पालकमंत्री पंकजाताई मुंडे आणि खा. प्रीतमताई मुंडे यांनी विशेष प्रयत्न केले, त्यांच्या प्रयत्नामुळेच या रेल्वे मार्गाला खर्‍या अर्थाने गती मिळाली, विशेष म्हणजे मुंडे भगिणींमुळेच केंद्राने या रेल्वे मार्गाला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलेला आहे, आणि सध्याही मिळत आहे. राज्य शासन मात्र या मार्गाला तुटपुंजा निधी देवून जिल्हावासायांची एक प्रकारे थट्टाच करत आहे. हा रेल्वे मार्ग गतीने पुर्ण व्हावा, याअनुषंगाने पंकजाताईंबरोबरच खा. प्रीतमताई प्रयत्न करत आहेत. या मार्गात छोटे-मोठे अडथाळे दुर करण्यासाठी त्यांच्याकडून सातत्याने प्रयत्न होत असल्याचेही पहायला मिळत आहे. याअनुषंगानेच त्या येत्या 28 जानेवारी रोजी दुपारी एक वाजता नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाबाबत रेल्वे विभाग आणि महसूल विभागाची बैठक घेणार आहेत. ही बैठक जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तत्पुर्वी त्या उद्या दि. 25 जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता बीडमधील हॉटेल यशराजमध्ये राम मंदिर निर्माण निधी संकलनाबाबत बैठक घेणार आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी ही बैठक लावलेली आहे. 26 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता त्या कै. अभय चाटे (मा.जिल्हाध्यक्ष भाजपा परभणी) यांच्या दशक्रिया विधी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत., सायंकाळी पाच वाजता परळीमधील त्या एक नंबर चहा या फर्मचे उद्घाटन करणार आहेत. 27 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता घाटसावळी याठिकाणी राम मंदिर निर्माण निधी संकलन शोभायात्रा, दुपारी बारा वाजता राजेगाव (ता.माजलगाव) याठिकाणी जलशुध्दीकरण केंद्राचे उद्घाटन, दुपारी दिड वाजता बुथ व शक्ती केंद्र रचना बैठक (मराठवाडा विभाग), दुपारी आडीच वाजता माजलगाव येथील वैष्णवी मंगल कार्यालयात राम मंदिर निर्माण निधी संकलनाबाबत बैठक घेणार आहेत. दुपारी साडे तीन वाजता मनुरवाडी (ता.माजलगाव) येथील जलशुध्दीकरण केंद्राला भेट देणार आहेत. तर 28 जानेवारी रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाच्या भुसंपादनाबाबत रेल्वे आणि महसूल विभागाची बैठक घेणार आहेत. या बैठकीनंतर त्या दिल्लीला संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला जाणार आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!