महाराष्ट्र

‘यापेक्षा दुसरा ’संतोष’ काय?, निवडणूक जिंकलेल्या नवर्‍याला चक्क खाद्यांवर उचलून बायकोनेच मिरवले


पुणे – ग्रामंपचायत निवडणुकांच्या निकालांकडे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांचे लक्ष लागले होते. कारण, गावच्या निवडणुकीत काय होतंय, याची उत्कंठा दिल्लीत नोकरी करणार्‍या आणि विदेशात जॉब करणार्‍यांनाही होती. त्यामुळेच, सोशल मीडियावरुन आपल्या गावची खबरबात ठेवणं, गावकडील व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी असणं हे गेल्या काही दिवसांतील दिनक्रम होता. त्यामुळेच, निकालानंतर विजयाची मिरवणूक आणि जल्लोषाचा गुलाल उधळायला सर्वचजण सज्ज होते. मात्र, कोरोनामुळे मिरवणुकीला बंदी घालण्यात आली होती. मात्र, पुणे जिल्ह्यातील एका ग्रामपंचायत निवडणुकीत पती निवडून आल्यानंतर पत्नीने चक्क खांद्यावर उचलून पतीची मिरवणूक काढली.
निवडणुकीत उमेदवार जिंकला की जवळचे दोस्त, कार्यकर्ते किंवा उमेदवाराच्या वजनाला पेलू शकेल, अशी व्यक्ती विजयी उमेदवारा खांद्यावर उचलतात. कपाळी गुलाल, गळ्यात हार आणि हलगीनं वाजत-गाजत मिरवणूक काढली जाते. मात्र, यंदात कोरोनामुळे विजयी सभा आणि मिरवणुकांना प्रशासनाने बंदी घातली होत. तरीही, कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष केलाच. पोलिसांच्या काठ्याही खाल्ल्या, पण निवडणूक जिंकल्याचा आनंद साजरा केलाच. पुण्यातील पाळू ग्रामपंचायतीतील एका उमेदवाराच्या विजयाची मिरवणूक लक्षवेधी ठरली. कारण, येथे कार्यकर्त्यांऐवजी चक्क पत्नीनेच पतीला खांद्यावर उचलून घेतले होते. गावातील जाखमाता ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा दारुण पराभव करत जाखमातादेवी ग्रामविकास पॅनलने 7 पैकी 6 जागावर वर्चस्व मिळवले. या घवघवीत यशामागे महिलांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे विजयाचा जल्लोष करत असताना गावातील विजयी उमेदवाराच्या पत्नीने आपल्या पतीच्या विजयायाचा हटके जल्लोष केला. पती संतोष यांना खांद्यावर उचलून पत्नी रेणुकाने गावात आनंदाने मिरवणूक काढली. पाळू ग्रामपंचायतीमध्ये संतोष शंकर गुरव यांनी 221 मतं मिळवत विरोधी उमेदवाराला पराभूत केले. या उत्साही पती-पत्नीचे फोटो गावात आणि सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेकांनी या पती-पत्नीच्या राजकारणातील उत्साहाचं कौतुक केलंय.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!