बीड

दुसर्‍या दिवशीही खासदार बांधावर, शेतकर्‍यांचे प्रश्‍न हाती घेवून जिल्हाधिकार्‍यांना भेटल्या, रहाडे कुटूंबियांचेही केले सांत्वन


बीड, दि. 1 ऑक्टोबर: सत्ता असो की नसो मुंडे भगिणी जनतेच्या, शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसाठी नेहमीच पुढे असतात, मागच्या पाच वर्षात जिल्ह्यातील शेतकर्‍यांवर अनेक संकट कोसळले, त्यांच्या दु:खात ह्या दोन्ही भगिणी प्रत्येक वेळी धावून गेल्या, या दरम्यान संकटाच्या काळात विरोधकांनी फक्त राजकारण करण्याचा प्रयत्न केला, सध्या विरोधात असतानाही खा. प्रीतमताई अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना बांधावर जावून आधार देत आहेत. बुधवारी त्यांनी अंबाजोगाई, केज परिसरात दौरा करून पिकांची पाहणी केली, तर गुरूवारी माजलगाव आणि गेवराई तालुक्याचा दौरा केला, आलेला संकटाचा धैर्याने सामना करावा, तुम्हाला मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचा विश्‍वास यावेळी खा. प्रीतमताईंनी शेतकर्‍यांना दिला आहे. तर शेतकर्‍यांच्या याच प्रश्‍नासाठी त्यांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली, शेतकर्‍यांच्या पीकांचे तातडीने पंचनामे करून त्यांना मदत मिळवून द्यावी, अशा मागणीचे पत्र त्यांनी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना दिले आहे.
यावर्षी झालेल्या अधिकच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या पीकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ही परिस्थिती लक्षात घेवूनच अधिवेशन संपताच खा. प्रीतमताई जिल्ह्यात येवून थेट शेतकर्‍यांच्या बांधावर दाखल झाल्या, बुधवारी त्यांनी अंबाजोगाई, केज तालुक्यातील पिकांची पाहणी केली, यावर्षी शेतातील पिकांचे झालेले आतोनात नुकसान पाहूण त्यांना खुपच वाईट वाटले, यामुळेच शेतकर्‍यांना हेक्टरी पन्नास हजार देण्याची मागणी त्यांनी केली, तर दुसर्‍या दिवशीही त्यांनी बांधावर जावून शेतकर्‍यांच्या पिकांची पाहणी केली, गुरूवारी माजलगाव आणि गेवराई तालुक्यातल्या भेंडी टाकळी,पाचेगाव व एरंडगाव भागाला भेटी देऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. गेवराई तसेच माजलगाव भागातील शेतकरी हे प्रामुख्याने कापूस उत्पादक असल्यामुळे येथील शेतकर्‍यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीच्या अकस्मात संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.परंतु त्यांनी या संकटाचा धैर्याने सामना करावा, नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना मदत मिळावी यासाठी मी प्रयत्नशील असल्याचा विश्‍वास यावेळी खा. प्रीतमताईंनी शेतकर्‍यांना दिला, गेवराई तालुक्यापुर्वी त्यांनी माजलगाव तालुक्यातील चिखली आणि दिंदृड परिसरातील पिकांची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांशी संवाद साधला. तर जिल्ह्यात झालेल्या या नुकसानीची तात्काळ दखल घ्यावी, अनेक ठिकाणी पंचनामे करण्यासाठी अद्याप अधिकारीच आले नाहीत, हे सर्व गणित लक्षात घेवून गतीने पंचनामे करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशा अशायाचे पत्र खा. मुंडेंनी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना दिले आहे. त्यांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेवून सदर प्रश्‍नांवर चर्चा केली आहे. दरम्यान नुकसानाच्या पाहणीदरम्यान आ. लक्ष्मण पवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रमेश आडसकर यांचीही उपस्थिती होती.

आ. पवारांसह आडसकरांनी शेतकर्‍यांच्या
प्रश्‍नाकडे लक्ष वेधले

सध्या जिल्ह्यातला शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. अडचणीत असलेल्या या शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांकडे आ. लक्ष्मण पवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रमेश आडसकर यांनी लक्ष वेधले, खा. प्रीतमताईंसह या दोघांनीही माजलगाव आणि गेवराई परिसरातील पिकांची पाहणी केली.

मी रहाडे कुटूंबियांच्या कायम पाठीशी
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयातून स्टे मिळाल्यानंतर महाराष्ट्रातून सर्वात आधी खा. प्रीतमताई मुंडे यांनी संसदेत मराठा आरक्षणाच्या बाजूने आपली सक्षमपणे भुमिका मांडली होती, त्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे. मराठा आरक्षणासाठी केतूरा येथील तरूण विवेक कल्याण रहाडे याने बुधवारी आत्महत्या केली, याची माहिती मिळताच खा. प्रीतमताईंनी तातडीने केतूर्‍यात जावून रहाडे कुटूंबियांचे सांत्वन केले, मी रहाडे कुटूंबियांच्या सदैव पाठीशी राहील, अशा शब्दात खा. प्रीतमताईंनी यावेळी रहाडे कुटूंबियांना आधार देण्याचा प्रयत्न केला.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!