गेवराई

खड्ड्यातील पाण्यात बुडून तीन वर्षीय बालकाचा मृत्यू


तिंतरवणी, दि. 14 : गेवराई तालुक्यातील वंजारवाडी येथील फोटोग्राफर शरद पवार यांचा मुलगा शुभम पवार वय 3 वर्षे याचा खड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची झाल्याची घटना काल घडली.
शुभम पवार हा त्यांच्या घरासमोर इतर मुला सोबत खेळत होता .त्यांच्या घरासमोरुन वजांरवाडी ते 222 ला जोडणारा रस्ता गेला असल्याने रस्त्याच्या कडेला खदानी तयार झाल्या आहेत, त्यातच पाऊस भरपूर झाल्याने त्या डबडब भरल्या असल्याने शुभम खेळता खेळता त्या खडुयाकडे गेला व पाय घसरून त्यामध्ये पडला थोडयाच वेळात मुलगा न दिसल्यामुळे घरच्यांनी इकडे तिकडे पाहीले पंरतू तो काही दिसून आला नाही, त्यानंतर त्या खदानी मध्ये शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये त्या चिमुकल्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले वंजारवाडी सह पंचक्रोषीमध्ये या दुर्दैवी घटनेबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना शनिवारी घडली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!